टिकटॉककडून भारतातील कुपोषणाच्या समस्येबाबत जनजागृती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2019
Total Views |


माता आणि बालकांसाठी जागतिक पातळीवरील एक पोषण उपक्रम समजल्या जाणार्‍या अलाईव्ह अँड थ्राईवने जगातील आघाडीचा शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म असणार्‍या टिकटॉकच्या सहयोगाने इन ॲप क्विझचे आयोजन केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून भारत सरकारच्या राष्ट्रीय पोषण महिना म्हणजेच नॅशनल न्युट्रीशन मंथबाबल लोकांच्यात जागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

#घरघरपोषण मोहिमेंतर्गत भारतातील लोकांना प्रामुख्याने महिला आणि लहान मुलांमध्ये दैनंदिन जीवनातील पोषण आहाराविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या माध्यमातून टिकटॉक युजर्स काही प्रश्‍नांची उत्तरे देउन आपले पोषण आहाराबाबतचे ज्ञान वाढवू शकतील. याचवेळी त्यांना पोषण आहाराबाबत काही मुलभूत तथ्ये सांगता येतील.

#GharGharPoshan या महिन्यात सुरु करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत तिला टिकटॉक ॲपवर ५६६.९ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. या मोहिमेमधून पोषक आहाराबाबत व्हिडिओ तयार करुन ते शेअर करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे लोक त्यांच्या दैनंदिन आयुष्यात संतुलीत आहार घेउन त्याबाबत साध्या टीप्स इतरांशी शेअर करु शकतील.

यामध्ये प्रामुख्याने पुढील टीप्सचा समावेश आहे.

घरच्या घरी आरोग्यदायी ज्यूसची रेसिपी

जंक फूडऐवजी आरोग्यास पोषक पदार्थांची निवड

नवजात बालकांसाठी स्तनपानाचे महत्व

आरोग्यदायी स्नॅक फूड पर्याय

आहारात अंड्याच्या समावेशाचे फायदे

ठरावीक वेळेच्या अंतराने योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन

शाकाहारींसाठी प्रोटीन सॅलड

मोहिमेच्या थीमचा विचार करुन या महिन्याच्या प्रारंभी, टिकटॉकने काही इंटरॅक्टिव स्टिकर्स लाँच केली आहेत. या स्टिकर्सच्या माध्यमातून युसर्ज नियमितपणे आपले व्हिडिओ ॲपवर शेअर करतील. इतर युजर्स ते व्हिडिओ पाहतील आणि एक़मेकांपासून पोषण आहाराबाबत ज्ञान मिळवतील, अशी अपेक्षा आहे.

@@AUTHORINFO_V1@@