एकाही हिंदू व्यक्तीला देश सोडावा लागणार नाही : सरसंघचालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2019
Total Views |



कोलकाता : 'एनआरसी'अंतर्गत एकाही हिंदू व्यक्तीला देश सोडावे लागणार नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी सोमवारी कोलकाता येथे केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांमध्ये सोमवारी एक बैठक पार पडली.

 

या बैठकीदरम्यान जेव्हा 'एनआरसी'चा मुद्दा मांडण्यात आला, त्यावेळी डॉ. मोहनजी भागवत यांनी हे वक्तव्य केल्याचे समजते. 'एनआरसी'अंतर्गत एकाही हिंदू व्यक्तीला देश सोडावा लागणार नाही. ज्या हिंदूंचे इतर देशांमध्ये शोषण झाले आहे, जे मायदेशी परतले आहेत, असेही हिंदू भारतात राहू शकतात असे त्यांनी म्हटले.

 

डॉ. मोहनजी भागवत हे दि. १९ सप्टेंबरपासून कोलकाता येथे आहेत. दोन दिवसांची ही बैठक असून यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पश्चिम बंगालमध्ये आधी टॅक्सी आल्या आणि त्यानंतर 'एनआरसी' आले. मात्र, या राज्यातल्या हिंदूंनी चिंता करण्याची आवश्यकता नाही असेही ते म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@