पंजाब महाराष्ट्र बँकेच्या ग्राहकांना मोठा फटका : दिवसाला हजार रुपये काढण्याची मर्यादा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2019
Total Views |



मुंबई : पंजाब महाराष्ट्र बँकेतील ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब महाराष्ट्र बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्याने खातेदारांना दिवसाला फक्त हजार रुपये काढण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. बँकेच्या अनेक ठेवीदारांनी कर्ज घेऊन ती परत न केल्यामुळे बँकेवर आर्थिक संकट ओढवले आहे. यामुळे बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्याची प्रार्थमिक माहिती आहे.

 

यासंदर्भात मंगळवारी सकाळी पीएमसी बँक बंद झाल्याच्या अफवा उठल्या. मात्र, तसे काहीही नसल्याचे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले. असे असले, तरीही दिवसाला फक्त १ हजार रुपयांचे बंधन ग्राहकांना घालण्यात आल्याने खातेदारांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी बँकेकडून सर्व खातेदारांना मोबाईलवर संदेश पाठवून पीएमसीवरच्या निर्बंधासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यासह बँकेकडून आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचे प्रयत्न केले जात असून येत्या सहा महिन्यात त्यावर उपाय योजण्यात येतील असेही आश्वासन बँकेचे एम.डी.  जॉय थॉमस यांनी दिले आहे.




 

 

पीएमसी बँकेवर येत्या ६ महिन्यांसाठी आर्थिक बंधनं टाकण्यात आली आहेत. बँकेच्या आर्थिक अनियमिततेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल आम्हाला खेद आहे. बँकेचा व्यवस्थापकीय संचालक म्हणून मी या सगळ्याची जबाबदारी घेतो आणि सर्व ठेवीदारांना हमी देतो की ६ महिन्यांच्या मुदतीपूर्वी ही परिस्थिती सुधारली जाईल. हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. मला माहीत आहे की आपणा सर्वांसाठी ही एक अवघड वेळ आहे आणि कोणत्याही दिलगिरीने तुमचा मनस्ताप भरून निघणार नाही. कृपया सहकार्य करा. आम्हाला खात्री आहे की आम्ही या परिस्थितीवर नक्कीच मात करू आणि खंबीरपणे उभे राहू, अशी प्रतिक्रीया बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी व्यक्त केले.

@@AUTHORINFO_V1@@