चर्चेचे दिवस संपले; आता प्रत्यक्ष कृतीची वेळ : पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2019
Total Views |



संयुक्त राष्ट्र : 'हाउडी मोदी' कार्यक्रमानंतर सोमवारी संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणाच्या मुद्द्यावर बोलताना आता चर्चेची आणि गप्पा मारण्याची वेळ संपली असून प्रत्यक्ष कृतीची वेळ आली आहे, असे प्रतिपादन केले.

 

संयुक्त राष्ट्र संघात मोदी यांनी सोमवारी जलवायुपरिवर्तनावर उपस्थितांना संबोधित केले. यावेळी मोदी म्हणाले की, "न्यूयॉर्क दौऱ्यात माझी पहिली सभा पर्यावरण बदलावर होत आहे. पर्यावरणावर जगभरात काम केले जात आहे. परंतु, पर्यावरणाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आता प्रयत्न करणे गरजेचे नाही, तर शैक्षणिक, लाईफस्टाईल आणि विकासाच्या धर्तीवर थेट काम करणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे ही आपली परंपरा राहिली आहे. आम्ही भारतात इंधनात नॉन फॉसिलफ्युलची भागीदारी वाढवत आहोत. २०२२ पर्यंत आम्ही ऊर्जाला १७० गीगाबाईटपर्यंत घेऊन जाणार आहोत. तसेच पेट्रोल व डिझेलमध्ये बायोफ्युलची मिक्सिंग आणि परिवहन क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या कशी वाढवता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहोत," असे मोदी यांनी यावेळी सर्वांना सांगितले.

 

स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही सिंगल युज प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन केले होते. "संयुक्त राष्ट्राच्या या इमारतीवर आम्ही भारताच्या सोलर पॅनेलचे उद्घाटन करू," असेही मोदींनी म्हटले." पर्यावरणावर आता केवळ चर्चा करीत बसण्यापेक्षा थेट काम करणे गरजेचे आहे," असे मोदी म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@