सोशल मीडियाचा गैरवापर थांबवा ; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2019
Total Views |



नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सोशल मीडियाच्या गैरवापरावर चिंता व्यक्त करत देशात सोशल मीडियाचा दुरूपयोग होत असल्याचे सांगितले आहे. हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर नियम तयार करावेत असे आदेश दिले आहेत. यासाठी सरकारला तीन आठवड्याचा कालावधी देण्यात आला आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, 'सध्या असा नियमांची गरज आहे ज्यामुळे ऑनलाइन फसवणूक आणि सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती पोस्ट करणाऱ्यांना ट्रॅक करता येईल. सोशल मीडियाचा गैरवापर कऱणाऱ्यांना रोखण्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान नाही असे म्हणता येणार नाही. जर गुन्हेगारांकडे फसवणूक करण्यासाठी तंत्रज्ञान आहे तर ते रोखण्यासाठीही तंत्रज्ञान असेलच.'

 

न्यायाधीश दीपक गुप्ता आणि न्यायाधीश अनिरुद्ध बोस यांच्या पीठाने सोशल मीडियाच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली. सोशल मीडियावर चुकीचे मेसेज पसरवणाऱ्यांची खरी ओळख होत नाही. सरकारला आता यावर उपाययोजना केल्या पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@