दोन वर्षांत सर्व बसेस होणार इलेक्ट्रीक : गडकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रीक वाहनांशी संबंधित एक मोठी घोषणा केली आहे. दोन वर्षात देशभरातील सर्व बसेस इलेक्ट्रीक होणार असल्याचे ते म्हणाले. नॅशनल कॉनक्लेव्ह इन मायक्रो, स्मॉल एण्ड मीडियम एंटरप्रायझेसच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

बायोडिझेल, सीएनजी, इथेनॉल, मेथेनॉलद्वारे चालणार बस

गडकरी म्हणाले, "ज्या गाड्यांना ईलेक्ट्रीक वाहनांमध्ये बदलणे शक्य नसेल, अशा वाहनांना स्वच्छ इंधनाचा पर्याय म्हणून देण्यात येईल. दरम्यान गडकरी यांनी यापूर्वीही पर्यायी इंधनाला चालना देण्यासाठी आवाहन केले आहे. या अंतर्गत नियमावली बनवण्यात येणार आहे. मात्र, या बद्दल कोणतिही सक्ती केली जाणार नसल्याचे गडकरी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. वाहन क्षेत्रावर मंदीचे सावट असतानाही गडकरी यांनी इलेक्ट्रीक वाहनांना कायम समर्थन दिले आहे.

@@AUTHORINFO_V1@@