सोनिया गांधी, मनमोहन सिंग चिदंबरम यांच्या भेटीला तिहार तुरूंगात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसची सध्या बिकट अवस्था आहे. अशामध्ये राहुल गांधींचे अध्यक्षपद सोडणे, नावाजलेल्या नेत्यांनी केलेले पक्षांतर, पक्षातील अंतर्गत वाद यामुळे काँग्रेस सध्या बॅकफूटवर आहे. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना झालेली अटक पक्षाच्या जिव्हारी लागली आहे. यानंतर सोमवारी सकाळी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसच्या अध्यक्ष्या सोनिया गांधी यांनी आयएनएक्स घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेल्या पी. चिदंबरम यांची भेट घेतली.

 

सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या तिहार चिदंबरम यांच्या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 'आयएनएक्स मीडिया' प्रकरणी पी. चिदंबरम यांना २१ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची ५ सप्टेंबरला तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली. दिल्लीतील न्यायालयाने चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडी १९ सप्टेंबरपासून ३ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्यानंतर काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी चिदंबरम यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

@@AUTHORINFO_V1@@