शेअर मार्केटमध्ये मोठी भरारी ; निर्देशांकाने घेतली मोठी उसळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2019
Total Views |



मुंबई : सोमवारी सकाळी शेअर बाजारात मोठी उसळी घेतली. सकाळी बाजार उघडताच निर्देशांक ११११.२१ अंकांनी वधारला होता. तसेच, निफ्टीमध्येही ३०० अंकांनी वाढ झाली होती. गेल्या आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स १,९२१ अंकांनी वधारला होता. गेल्या एक दशकातील ही उच्चांकी वाढ होती. शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी कार्पोरेट कराच्या दरात कपात करण्याची घोषणा केली होती. त्याचा परिणाम सोमवारीदेखील शेअर मार्केटमध्ये दिसून आला.

 

आयटीसी, एल अँड टी, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स आणि एम अँड एमच्या शेअर्सचे दर ५ ते ७ टक्क्यांनी वाढले आहेत. सध्याच्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स ३० टक्क्यांहून घटवून २२ टक्के करण्यात आला आहे, तर १ ऑक्टोबर २०१९ नंतर सुरू होणाऱ्या नव्या कंपन्यांसाठी हा दर २५ टक्क्यांवरून घटवून १५ टक्के करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर कोणत्याही प्रकारची सवलत न घेणाऱ्या कंपन्यांच्या करामध्ये कपात करून दर २२ टक्के करण्यात आला आहे. तर अधिभार आणि सेझ मिळून एकूण २५.१७ टक्के कर द्यावा लागेल. या माध्यमातून उद्योग क्षेत्राला उभारी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

@@AUTHORINFO_V1@@