'रॉमकॉम' चित्रपटाचे अनोखे ३ डी पोस्टर प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2019
Total Views |


 

गोरख जोगदंडे दिग्दर्शित 'रॉमकॉम' या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आणि ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. याचे कारण म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच एक ३ डी पोस्टर म्हणजेच थ्री डायमेन्शनल पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. त्यामुळे या पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. राहुल आणि सुमन या दोघांची प्रेमकथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार असून या चित्रपटातील कलाकारांच्या नावाबद्दल चित्रपटकर्त्यांनी अजून खुलासा केलेला नाही.

चित्रपटाचे हे ३ डी पोस्टर रंगीबेरंगी आहे ज्यामध्ये राहुल आणि सुमन यांच्या प्रेमाचा रंग देखील अलगद मिसळला आहे, असे म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये अशा प्रकारच्या पोस्टरचा प्रयोग करण्यात आला होता आणि आता मराठी चित्रपटसृष्टीनेदेखील हा प्रयत्न यशस्वी केल्याचे दिसून येते.


ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट फिल्म यांनी 'रॉमकॉम' या चित्रपटाची निर्मिती केली असून सचिन शिंदे चित्रपटाचे निर्माते आहेत तर सुशील शर्मा हे सहनिर्माते आहेत. रेमोलो एंटरटेन्मेंटच्या मोहन सचदेव यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या अनोख्या थ्रीडी पोस्टरच्या प्रयोगामुळे प्रेक्षकांना चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झाले असून येत्या १८ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.

@@AUTHORINFO_V1@@