अभिमानास्पद ; मराठमोळ्या राहुल आवारेची ऐतिहासिक कामगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2019
Total Views |



नवी दिल्ली : कझाकिस्तान येथे सुरु असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये मराठमोळ्या राहुल आवारेने कांस्यपदक जिंकले. अशी कामगिरी करणारा तो पहिला मराठमोळा कुस्तीवीर ठरला. कांस्यपदकाच्या लढाईत राहुलने ६१ किलो वजनी गटात अमेरिकेच्या टायलर ग्राफचे आव्हान मोडीत काढले. त्याने ही लढत ११-४ अशी जिंकली. दरम्यान, भारताच्या कुस्तीपटूंनी या स्पर्धेत यंदा सर्वोत्तम कामगिरी केली आहे. याआधी २०१३ मध्ये भारतीय कुस्तीपटूंनी या स्पर्धेत ३ पदके जिंकली होती.

 

जागतिक कुस्ती स्पर्धेत राहुल आवारे हा पदक जिंकणारा पहिला मराठमोळा पैलवान ठरला. महाराष्ट्राचेच पैलवान खाशाबा जाधवांनी १९५२ साली हेलसिंकीत भारताला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंना नेहमी पादकांनी हुलकावणी दिली. भारतीय कुस्तीपटूंनी कझाकिस्तान येथे सुरू असलेल्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. राहुल आवारेच्या पदकासह भारताने या स्पर्धेत ५ पदके जिंकली आहेत. यात १ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. दरम्यान, भारत विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.

@@AUTHORINFO_V1@@