आता मोबाईल अॅपवर होणार २०२१ची जनगणना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : भारतामध्ये डिजिटलचे वारे वाहत असताना आता भारताची १६वी जनगणनादेखील आता डिजिटल पद्धतीने करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिल्लीमध्ये जनगणना भवनाची पायाभरणी केली. "जनगणना देशाच्या भविष्याच्या विकासाची योजना बनवण्याचा आधार आहे. त्यासाठी लोकांचा सहभाग गरजेचा आहे. १८६५ पासून आतापर्यंत ही १६वी जनगणना होणार आहे. अनेक बदल आणि नव्या पद्धतींनंतर आता जणगणना डिजिटल होणार आहे." असे त्यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिल्लीत जनगणना भवनाचे उद्घाटन केले. या दरम्यान जनगणना इमारत ही संपूर्णपणे हरित इमारत असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

"२०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी मोबाईल अॅपचा वापर केला जाणार आहे. यामध्ये डिजिटल पद्धतीने आकडेवारी उपलब्ध होणार आहे. जितक्या बारकाईने जनगणना होईल, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी तितकीच मदत मिळणार आहे. डिजिटल जनगणनेसाठी, १६ भाषांचा समावेश करण्यात आला आहे, जेणेकरुन लोक त्यांची माहिती योग्य प्रकारे देऊ शकतील." अशी माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.

 

"२०२१मध्ये केल्या जाणाऱ्या जनगणनेवेळी मोबाईल अॅपचा वापर केला जाणार आहे. यामुळे डिजिटल स्वरूपात सर्व माहिती उपलब्ध केली जाणर आहे. ज्या बारकाईने देशातील जनगणना केली जाईल, तितकीच देशाच्या अर्थतंत्राला मजबूती मिळेल.", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, "२०१४मध्ये जेव्हा मोदी सरकार पहिल्यांदाच सत्तेत आले तेव्हापासूनच जनगणनेची नोंदणी योग्यपद्धतीने करण्यावर भर देण्यात आला होता. उज्वला योजना हे याचे महत्वपूर्ण उदाहरण आहे. याच आकडेवारीतून त्यावेळी स्पष्ट झाले होते कि, ९३ टक्के लोकांकडे गॅस जोडणी नाही. जेव्हा डिजिटल स्वरुपात याची नोंद ठेवली जाऊ लागली त्यावेळेस लोकांना गॅस जोडणी मिळू लागली." 

@@AUTHORINFO_V1@@