आजाराचे विश्लेषण भाग-३

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2019
Total Views |
 


डॉ. सॅम्युएल हॅनेमान यांनी सर्वप्रथम रुग्णाच्या लक्षणांच्या वर्गीकरणाची पद्धत वापरली. परंतु, या पद्धतीला काही मर्यादा होत्या व ही पद्धत थोडीशी किचकट व मेहनतीची होती.


होमियोपॅथीमध्ये जसा नवीन औषधांचा अंतर्भाव होऊ लागला
, त्यानंतर या प्रत्येक औषधांमधील लक्षणे या पद्धतीने वर्गीकरण करताना चिकित्सकांना थोडेस कठीण जाऊ लागले. अशावेळी डॉ. जे. टी. केंट यांनी लक्षणांच्या वर्गीकरणाची नवीन पद्धत शोधून काढली. डॉ. केंट यांनी सर्वप्रथम रुग्णाच्या लक्षणांवरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास सुरू केला व होमियोपॅथीतील सिद्ध केलेल्या औषधांच्या गुणधर्म व लक्षणांवरून या औषधांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केला व रुग्णाचे व औषधाचे व्यक्तिमत्त्व जुळते का, ते पाहून मग लक्षणांचे वर्गीकरण सुरू केले. त्यांनी मुख्यत्वे तीन प्रकारांमध्ये हे वर्गीकरण केले.

 

) रुग्णाची स्वत:ची विशेष लक्षणे

) सामान्य लक्षणे

) शरीरातील अवयवांची लक्षणे

 

) ज्या संवेदना किंवा जी लक्षणे रुग्ण ‘मी’ किंवा ‘मला’ या वैयक्तिक सर्वनामाने दर्शवतो, ती संवेदना किंवा लक्षणे ही त्या रुग्णाची वैयक्तिक लक्षणे असतात व त्यांना ‘विशेष दर्जा’ दिला जातो. उदा. जेव्हा रुग्ण स्वत:च्या तहान, भूक किंवा झोप इत्यादीबद्दल माहिती देत असतो, तेव्हा तो असे म्हणत नाही की, माझ्या पोटाला भूक लागली आहे किंवा माझ्या पोटाला वा आतड्यांना तहान लागली आहे. तो असेही सांगत नाही की, माझ्या डोक्याला व डोळ्यांना झोप येते आहे, तर तो असे सांगतो की, ‘मला’ तहान लागली आहे किंवा ‘मला’ झोप येते किंवा ‘मला’ भूक लागते.

 

किंवा एखाद्या स्त्रीला जेव्हा मासिक पाळी सुरू असते, तेव्हा ती सांगते की, मला मासिक स्राव सुरू आहे. ती असे सांगत नाही की, माझ्या गर्भाशयाला मासिक पाळी सुरू आहे. याचाच अर्थ, जी लक्षणे रुग्ण अवयवांच्याही मागे जाऊन जो ‘मी’ आहे त्याच्याविषयी सांगतो, त्यालाच डॉ. केंट ‘विशेष लक्षणे’ किंवा (Generalities) असे म्हणतात. ही लक्षणे शरीरातील कुठल्याही अवयवांची नसून त्या व्यक्तींची असतात. ही लक्षणे जर रुग्णामध्ये खास करून दिसत असतील, तर इतर अवयवांच्या सामान्य लक्षणांपेक्षा या लक्षणांना औषध शोधताना विशेष महत्त्व दिले जाते. म्हणूनच डॉ. केंट यांनी लिहून ठेवले आहे की, रुग्णाचे औषध शोधताना जर ही ‘विशेष लक्षणे’ (Generalities) शक्तिशाली असतील, तर रुग्णाची सर्व अवयांची लक्षणे औषधांच्या सर्व लक्षणांशी जुळून येतीलच असे नाही. तसे करत बसल्यास वेळेचा अपव्यय होतो.

 

परंतु डॉ. केंट यांनी पुढे हेदेखील सांगून ठेवले आहे की, काही रुग्णांमध्ये ही विशेष लक्षणे कमकुवत असतात. त्यानुसार औषधे शोधणे कठीण जाते. अशावेळी जर रुग्णाच्या अवयवाच्या लक्षणांपैकी काही लक्षणे जर लक्षवेधक, अतिशय खास व शक्तिशाली असतील तर त्या लक्षणांना विशेष दर्जा दिला पाहिजे व त्यानुसारच मग होमियोपॅथीचे औषध निवडले पाहिजे. डॉ. केंट यांनी याच विशेष लक्षणांमध्ये परत एक छोटे वर्गीकरण केले आहे. त्या वर्गीकरणामुळे औषध शोधणे सोपे झाले. या वर्गीकरणाबाबत आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत.


- डॉ. मंदार पाटकर

(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.) ९८६९०६२२७६

@@AUTHORINFO_V1@@