‘चले जाव’ करताना दुकान बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2019   
Total Views |




माझा हात धरून त्यांनी महाराष्ट्राच्या भ्रष्टदुष्ट राजकारणाचा अभ्यास केला आहे
. आता त्यांच्यात तो अभ्यास किती मुरला माहिती नाही. पण विकास किंवा लोकांचे कल्याण करण्यासाठी ते नेमक्या त्याच पक्षात गेले, ज्या पक्षाला मला ‘चले जाव’ करायचे आहे. इंग्रजांना चले जाव करून हाकलले, तसे मला यांना हाकलायचे आहे.



मी इतका जाणता राजा
, महाराष्ट्र म्हणजे मी आणि मी म्हणजे महाराष्ट्र असे किती वर्षे मी समीकरण केले होते. पण लोकांना काय झाले माहीत नाही. मी जे बोलतो, त्याच्या नेमके उलट करायला लागलेत. गैर तर गैर आमचे सरदार-जहागिरदार, वतनदार सगळे सगळे उलट करत उलटलेच. पण काय करणार, त्यांनी जे केले त्यांना विश्वासघात कसा म्हणू? कारण ते मला गुरू मानतात, नव्हे मानायचे. त्यामुळे माझ्या पावलावर पाऊल टाकणारच. माझ्या पावलावर पाऊल टाकत माझ्या पाठीत खंजीर खुपसला, असे तरी कसे म्हणू? कारण ते सगळे माझे चेले आहेत. पुलोद वगैरे त्यांनी त्यांच्या ‘याचि देही याचि डोळा’ पाहिलेले आहे. माझा हात धरून त्यांनी महाराष्ट्राच्या भ्रष्टदुष्ट राजकारणाचा अभ्यास केला आहे. आता त्यांच्यात तो अभ्यास किती मुरला माहिती नाही. पण विकास किंवा लोकांचे कल्याण करण्यासाठी ते नेमक्या त्याच पक्षात गेले, ज्या पक्षाला मला ‘चले जाव’ करायचे आहे. इंग्रजांना चले जाव करून हाकलले, तसे मला यांना हाकलायचे आहे. मला त्या कमळवाल्यांना घेरून त्यांना हाकलवायचे होते. मी तसे म्हटलेही की, भाजपला चले चाव म्हणायची वेळ आली आहे, लोकहो तुम्ही आणि मी मिळून त्या कमळवाल्यांना हाकलवू शकतो. पण माझे ना त्या शोलेतल्या तुरुंगाधिकारी असरानीसारखे झाले. मी माझ्या सुभेदार, कमांडर वगैरे वगैरे जे काही म्हणू शकतो अशा नेत्यांना म्हणालो, चला रे भाजपला हाकलवू या, जावो... आधे उधर, आधे इधर, बाकी मेरे पिछे आवो. तर काय, हे सगळे वाटच बघत होते तसे निघून गेले. आधे इधर शिवसेना आणि आधे उधर भाजपमध्ये. माझ्या पाठी उरले तेच जण ज्यांचा ना पक्षाला फायदा ना त्यांच्या मतदारसंघाला. काही जण भेटतात, सांगतात, ईडीची चौकशी मागे लागेल म्हणून आम्ही त्यांच्या पक्षात गेलो. ईडीची चौकशी यांच्याच मागे लागते. बहाणे आहेत त्यांचे. पण, मी काही भाजपला हाकलल्याशिवाय गप्प बसणार नाही, नाही म्हणजे नाही. त्यांना ‘चले जाव’ करणारच करणार. कसे करणार म्हणता? त्यात काय इतके? बोलायला काय पैसे लागतात का? अशक्यच गोष्ट आहे, पण असे बोलले नाही तर कसे चालेल? दुकान चालण्यासाठी करावे लागते. काय म्हणता त्यांचे ‘चले जाव’ होण्याऐवजी माझे दुकान बंद व्हायची वेळ आली?


ते कधी तुरुंगात गेले नाहीत


शरदराव पवारकाका स्वतःची पॉवर ओळखतात
. त्यामुळेच त्या दिवशी ते म्हणाले, ‘’आम्ही काहीही केलं असेल पण कधी तुरुंगात गेलो नाही.” पवारकाका म्हणतात की आम्ही काहीही केलं असेल. आता असे काय केले असेल? या वाक्याला अनेक प्रश्नचिन्ह, अनेक उद्गारवाचक चिन्हे आणि अन्वयार्थ, अनेक विरोधाभास अशा काही बाही अनेक अनेक गोष्टी आहेत. असो, तर त्यांचे म्हणणे आम्ही काहीही केले तरी तुरुंगात गेलो नाही. यावर मनात आले, तुरुंगात जाणार्‍या सगळ्याच व्यक्ती अपराधी, गुन्हेगार नसतात. मुंबई, कल्याण, तळोजा, पुणे, नाशिक वगैरे तुरुंगातल्या गुन्हेगारांचे सर्वेक्षण केले तर लक्षात येईल की, ते जन्मजात गुन्हेगार नव्हतेच. त्यातले अर्धेअधिक तर लाचारी किंवा अज्ञानाने गुन्ह्यात अडकले आहेत. काही जणांना तर पुराव्याअभावी न केलेल्या गुन्ह्याची किंवा कुण्या दुसर्‍याच्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागली आहे. थोडक्यात तुरुंगात जाणारे सगळेच गुन्हेगार आणि तुरुंगाबाहेर राहणारे सगळेच धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असे काही नसते. पवारांच्या व्याख्येनुसार मग दाऊद इब्राहिम तुरुंगात नाही म्हणून तो निष्पाप वगैरे आहे का? मुद्दा हाच, तुरुंगात जाणे म्हणजे गुन्हेगारच असणे असे काही नाही. बरं, पवारकाका तुरुंगात गेलो नाही, असे म्हणताना त्यांना नुकतेच तुरुंगातून आलेले छगन भुजबळ आपल्यासोबत हवे आहेत. तसेही यांच्याच पक्षाच्या कळव्याच्या नेत्यांनी अतिरेकी कारवाया करू इच्छिणार्‍या इशरत जहाँच्या नावाच्या अ‍ॅम्ब्युलन्स काढल्या. यांच्याच पक्षाने पक्षातील इतरांच्या कर्तृत्वाला डावलून माजिद मेमन याचे मोठे कर्तृत्व पाहून राज्यसभेचे खासदार बनवले. कोणाच्या सत्ताकाळात १९९३ साली मुंबई बॉम्बस्फोटाने हादरून गेली? त्यावेळी हिंदूच्याच वस्तीत बॉम्बस्फोट झाले सांगू नका, असे मोठ्या अधिकारवाणीने सांगत सत्य लपवणारी कोण व्यक्ती होती? गोवारी हत्याकांड, लवासा प्रकरण, तेलगी प्रकरण एक ना अनेक प्रकरणे महाराष्ट्राने पाहिली आहेत. पण या सर्व प्रकरणात कुणाला शिक्षा झाली आणि तुरुंगात गेले, हे सुद्घा महाराष्ट्राने पाहिले. त्यामुळे पवारकाकांचे पहिल्यांदा म्हणणे पटले की, आम्ही काहीही केले असेल पण कधी तुरुंगात गेलो नाही.

@@AUTHORINFO_V1@@