शरीरात १३० फॅक्चर असणारा चिमुकला आज मोदींसह गाणार राष्ट्रगीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2019
Total Views |


 


ह्युस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'हाऊडी मोदी' या सोहळ्यासाठी अमेरिकेत पोहोचले आहेत. या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमासाठी देशवासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या कार्यक्रमात विविध कार्यक्रमादरम्यान एक खास गोष्टही आहे. मुळचा भारतीय परंतू अमेरिकेत स्थायिक झालेला एक चिमुकला राष्ट्रगीत गाणार आहे. त्याच्या शरिरात १३० फॅक्चर आहेत.




 

 

अमेरिकेतील न्युजर्सी येथे राहणारे स्पर्श शाह हा १६ वर्षीय विद्यार्थी या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत गाण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी मी खुप उत्सूक आहे, असे स्पर्श सांगतो. स्पर्शने आपल्या ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. तो म्हणातो, 'भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रगीत गायनाची संधी मिळाल्याबद्दल मी भाग्यवान आहे. याचा मला अभिमान आहे.'


 

 

१६ वर्षीय स्पर्श शाह एक रॅपर, गायक आणि प्रेरणात्मक वक्ताही आहे. ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्टा या आजाराने त्रस्त असल्याने शरिरातील हाडे नाजूक होऊ लागतात आणि सहज तुटू लागतात. आत्तापर्यंत स्पर्शच्या शरीरातील हाडे १३० वेळा तुटली आहेत. त्यामुळे त्याचे शरीर नाजूक झाले आहे. मात्र, तो नेहमी उर्जावान आणि चेहऱ्यावर स्मितहास्य कायम ठेवतो. त्याला एमिनेम या गायका सारखी प्रसिद्धी मिळवायची आहे. एक अब्ज लोकांसमोर आपला लाईव्ह कार्यक्रम व्हावा, अशी त्याची इच्छा आहे.



 

स्पर्श शाह जरी व्हिलचेअरवर असला तरीही त्याच्या असण्याने तो इतरांना कायम स्पूर्ती देत असतो. आता तो एक सेलिब्रिटी बनला आहे. लोक त्याला ऐकणे पसंत करतात. तसेच तो सोशल मीडियावरूनही लोकांशी चर्चा करत असतो. हाऊडी मोदी दरम्यान त्याची उपस्थितीही वेगळे आकर्षण असणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@