खैरातीच्या विमानातून इम्रान खान अमेरिकेत दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2019
Total Views |




ह्युस्टन
: संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७४व्या अधिवेशनात भाग घेण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान न्यूयॉर्क येथे दाखल झाले. पण पुन्हा एकदा विमानतळावर त्यांना निराशेचा सामना करावा लागला. प्रोटोकॉलनुसार, अमेरिका या यजमान देशातील एकही मंत्री किंवा सरकारी अधिकारी त्यांचे स्वागत करण्यास विमानतळावर आला नाही. न्यूयॉर्क विमानतळावर परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह फक्त इम्रान खान यांचे पाकिस्तानमधील परराष्ट्र प्रतिनिधी आले होते.


महत्वाची बाब म्हणजे
, इमरान खान ज्या विमानातून न्यूयॉर्कला पोहोचले ते देखील सौदी अरेबियाचे होते. इम्रान खान न्यूयॉर्कला पोहोचण्यापूर्वी दोन दिवस सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर होते. काश्मीर मुद्द्यावर आपल्याला समर्थन मिळावे म्हणून त्यांनी सौदी दौऱ्याचा घाट घातल्याचे दिसून येते. आधीच अर्थव्यवस्था दिवाळखोरीत असल्याने ते प्रवासी विमानाने अमेरिकेला पोहोचणार होते. पण प्रिन्स खान यांनी इम्रान खान यांना विशेष अतिथी म्हणत आपल्या विमानातून अमेरिकेला नेले. त्यामुळे इम्रान खान न्यूयॉर्कला पोहोचले. इम्रान खान आणि नरेंद्र मोदी यांची भेट २७ सप्टेंबरला महासभेवेळी होणार आहे. या महासभेत पाकिस्तान काश्मीर मुद्दा उपस्थित करणार आहे.



पंतप्रधान मोदीही या सभेसाठी ह्युस्टन याठिकाणी पोहोचले आहे. मोदींच्या आगमनासाठी अमेरिकेच्या प्रतिनिधींसोबतच व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यवहार संचालक क्रिस्तोफर ओस्लान
, भारतातील अमेरिकेचे राजदूत केनेथ जस्टर यांचा समावेश होता. आज मोदी ह्युस्टन याठिकाणहून अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करणार आहेत. 'हाऊ दि मोदी' याकार्यक्रमाकडे भारत आणि अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारताचे पंतप्रधान आणि डोनाल्ड ट्रम्प या कार्यक्रमात एकत्र दिसणार आहेत त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

@@AUTHORINFO_V1@@