महापालिका शाळेत पाद्य्रांकडून काळ्या जादूचे प्रयोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2019
Total Views |



परळमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेतील धक्कादायक प्रकार; बजरंग दलाची तक्रार

 
 

मुंबई : परळ येथील ना. म. जोशी मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका शाळेत विनापरवानगी सुरू असलेल्या ख्रिस्ती धर्मीयांच्या प्रार्थनासभेत काळ्या जादूचे प्रयोग केले जात असल्याची तक्रार बजरंग दलाने रविवारी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात केली.

 

एका ख्रिस्ती मिशनरींकडून रविवारी सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान ही प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेत पाद्री आणि काही जादूगारांकडून काळ्या जादूचे प्रयोग केले जात होते. याप्रकरणी बजरंग दलाने जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. याबाबत रीतसर तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

 

ख्रिस्ती धर्मीयांच्या या सभेत अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जादूटोण्याचे प्रकार करून नागरिकांमध्ये अंधश्रद्धा पसरवली जात असल्याचा आरोप बजरंग दलाकडून करण्यात आला आहे. बजरंग दलाच्या तक्रारीनंतर या ठिकाणी पोलीस दाखल होताच सभेतील जादूगार आणि इतर काही मंडळी घटनास्थळावरून पसार झाली. रविवारी झालेल्या या सभेमुळे परळमधील कायदा सुव्यवस्था बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 

या सभेसाठी विविध शहरातून जादूगार आणि पाद्री आल्याचे समजते. गरीब वस्त्यांत अशा प्रकारच्या प्रार्थनासभांचे आयोजन ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून केले जात असते. या सभांचा उद्देश धर्मांतरणाचा असतो. स्थानिक पोलिसांनीदेखील यासाठी अशा प्रकारच्या सभेचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांना समज दिली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारच्या जोर जबरदस्तीचा वापर न करताही कार्यक्रमाच्या आयोजकांनी या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

 

या सर्व घटनेची लीगल राईट ऑब्झर्व्हेटरीकडून कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या शाळांचा अशा प्रकारे गैरवापर होत असल्याने महापालिकेचा शिक्षण विभाग अशा प्रकारच्या कार्यक्रमांना कशी परवानगी देऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@