‘भारतात सर्व छान चालले आहे’ : ह्युस्टनमध्ये मोदींचा मराठीतून हुंकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2019
Total Views |


 

 

ह्यूस्टन : बहुचर्चितहाऊडी मोदीकार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यावेळी एकाच व्यासपीठावर दाखल झाले. मोदी यांनी आपल्या भाषणात ”भारतात सर्व काही छान चालले आहे,” असे म्हणत १३० कोटी भारतीयांच्या भावना व्यक्त केल्या. हिंदी, पंजाबी, मराठी, गुजराती, बंगाली, तमिळ आदी भाषांमध्येही या वाक्याचा पुनुरुच्चार केला. रविवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात भारतीय समुदायाच्या तब्बल 50 हजार नागरिकांनी गर्दी कोली होती. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारच्या कारभाराचे तोंडभरून कौतुक केले.



 

मोदी यावेळी म्हणाले, “अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांचे संबंध आता अधिक घट्ट होणार असून या दोन्ही देशांमधील मैत्रीचे नाते आता आणखीन बळकट होणार आहेत. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये भारतच खरा मित्र आहे. येत्या दिवसांत दोन्ही देशांतील व्यापर संबंधांना बळकटी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शब्दाला फार किंमत असून जगभरातील अब्जावधी लोक डोनाल्ड ट्रम्प यांचा एक-एक शब्द फॉलो करतात,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्यार स्तुतीसुमने उधळली. मोदी यांच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारताचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध कार्यांची त्यांनी स्तुती करत या कार्यक्रमाबाबत मोदी यांचे आभार मानले.

@@AUTHORINFO_V1@@