सरसंघचालक साधणार विदेशी माध्यमांशी संवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत दि. २४ सप्टेंबरला नवी दिल्लीत विदेशी माध्यमांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी दिली. यावेळी सरसंघचालक विदेशी माध्यमांच्या प्रतिनिधींना संघाची मते, संघाचे कार्य आणि सामाजिक संदर्भात माहिती देणार आहेत. विदेशी माध्यमांमधील संघ आणि त्यांच्या कार्याबद्दल अधिक स्पष्टता आणणे हा या बैठकीचा उद्देश आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी शनिवारी येथे दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली.

अरुण कुमार यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत संघाचे विचार, कार्य आणि चालू घडामोडींवर चर्चा करण्यासाठी वेळोवेळी समाजातील विविध घटकांना भेट देतात. याच अनुषंगाने २४ सप्टेंबर रोजी ते दिल्ली येथील विदेशी माध्यमांच्या पत्रकारांची भेट घेतील. हा कार्यक्रम नियोजित संवादाचा एक भाग आहे. या संवादात सरसंघचालक विदेशी माध्यमातील पत्रकारांना संबंधित विषयांवरील संघाची मते मांडतील.

@@AUTHORINFO_V1@@