आज वाजणार विधानसभेचे बिगुल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2019
Total Views |



नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोग आज (शनिवारी) दुपारी घोषित करणार आहे. दुपारी १२ वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची माहिती देणार आहे. सध्याच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपत आहे.

 

महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यामध्ये सर्वच पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. आता तारखा निश्चित झाल्यानंतर निवडणुकांच्या रणधुमाळीला खरी सुरुवात होईल. सर्वच पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सभा आणि भेटींचे आयोजन करण्याचा सपाटा लावला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@