‘महाजनादेशा’ची भाऊवाणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2019   
Total Views |


 


ही निवडणूक
सत्ताधारी कोणहे ठरवणारी नसून भविष्यातील विरोधी अवकाश कोण व्यापणार हे सांगणारी असेल! आपल्या पुस्तकातून भाऊंनी यासाठी विविध आकडेवीर व टक्केवारीही दिली असून त्यामुळे हे पुस्तक मुळातूनच वाचण्याची तसे संग्रही ठेवण्याची इच्छा होते. ‘महाराष्ट्राचा महाजनादेशसांगणारी ही निवडणूक आहे, तशीच महाराष्ट्राचा विरोधी पक्ष ठरवणारीही आहे



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यव्यापी महाजनादेश यात्रेवर स्वार होत शहर
-जिल्हा-तालुका करत सर्वच प्रदेश पिंजून काढला. राज्यातल्या जनतेनेही मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला भरघोस प्रतिसाद दिला. ही गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या राज्य कारभाराने उत्साहित झालेल्यांची जशी गर्दी होती, तशीच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील युतीला मते देण्यासाठी सरसावणार्‍यांचाही हा जनसागर होता. परंतु, हे अचानक झाले काय? आतापर्यंत मराठा समाजातील व्यक्तीच महाराष्ट्रावर राज्य करू शकतो, असा एक समज इथल्या राजकीय वर्तुळात, निरीक्षकांत होता आणि त्याला रीतसर खतपाणी घालण्याचे कामही वेळोवेळी झालेच. मात्र, २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवख्या देवेंद्र फडणवीस यांच्या हाती महाराष्ट्राच्या सत्तेची चावी दिली आणि त्यांना मुख्यमंत्रिपदावर विराजमान केले. तेव्हापासून मुख्यमंत्र्यांच्या जातीवरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी काहूर माजवण्याचे पद्धतशीर उद्योग केले. मराठा आरक्षण, कोरेगाव-भीमा येथील हिंसाचार, पेशवाई-पुणेरी पगडीचा वाद असे अनेक मुद्दे यावेळी उठवले गेले. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन जातीयवादी राजकारण करणार्‍यांना आपल्या कर्तबगारीने नामोहरम केले. हा अर्थातच जातीपातीचे राजकारण मरणपंथाला लागल्याचा दाखला म्हणता येईल.



पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत राहून महाराष्ट्राच्या राजकारणाचे वर उल्लेखलेले सध्याचे चित्र भाऊ तोरसेकर यांनी वर्णित केले आहे. विशेष म्हणजे, भाऊंनी मांडलेले आडाखे आणि मते बहुसंख्यवेळा सत्यात उतरत असल्याचेही अनुभवायला मिळते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीआधी भाऊ तोरसेकर यांनी ‘पुन्हा मोदीच का?’ हे पुस्तक लिहून नरेंद्र मोदींनी केलेले कार्य आणि त्याला मिळणारा जनतेचा प्रतिसाद याचे विश्लेषण केले होते. सोबतच भाजपला लोकसभेत ३०० हून अधिक जागा मिळतील असे भाकित करणारे ते बहुधा एकमेव पत्रकार असतील आणि तो अंदाजही नंतर खराच ठरला. आताही भाऊंनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरमहाराष्ट्राचा महाजनादेश’ हे पुस्तक लिहिले असून आपली मते मांडली आहेत. उल्लेखनीय म्हणजे, सदर पुस्तकात केवळ गेल्या पाच वर्षांतील सरकारच्या कामाचाच आढावा घेतलेला नाही, तर अगदी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक आणि शरद पवारांचे राजकारण, तत्कालीन काँग्रेस व शेकाप, डाव्या, समाजवादी, रिपब्लिकन पक्षांचे राजकारण आदी विषय मांडले आहेत. त्याचबरोबर ९०च्या दशकातील भाजप व शिवसेना आणि त्यानंतर त्यांनी मिळवलेली सत्ता याचेही विश्लेषण केले आहे. हा सर्वच लेखाजोखा राजकीय अभ्यासकांसाठी तसेच पत्रकारितेत काम करणार्‍यांसाठीही मार्गदर्शक ठरावा असाच आहे. परंतु, भाऊंनी आपल्या पुस्तकातून भाजप-शिवसेना युती झाल्यास राज्यात २२० हून अधिक जागा व भाजप एकट्याने लढल्यास १५० हून अधिक जागा जिंकेल भाकीत केले आहे आणि तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी संपतील, असेही मत ठामपणे मांडले आहे. असे झाल्यास विरोध पक्ष म्हणून कोण उरेल? तर वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना! ते कसे?


काँग्रेस
-राष्ट्रवादी लढण्याच्या मनःस्थितीत नाही, जणू काही त्यांनी शस्त्र टाकून दिली आहेत आणि ते पराभूताचे शिक्कामोर्तब करण्यासाठी निवडणुकीची औपचारिकता पूर्ण करतील असे दिसते. अशा परिस्थितीत विद्यमान सत्ताधार्‍यांवर जहाल टीका करण्याचे काम वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि मनसेचे राज ठाकरे करू शकतात. पर्यायाने गलितगात्र झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच विविध चळवळी व छोट्या पक्षांचे समर्थकही आपल्या नेत्यांना सोडून वंचित व मनसेला साथ देतील, असा भाऊंचा ठोकताळा आहे. म्हणूनच भाऊंच्या मते, ही निवडणूक ‘सत्ताधारी कोण’ हे ठरवणारी नसून भविष्यातील विरोधी अवकाश कोण व्यापणार हे सांगणारी असेल! आपल्या पुस्तकातून भाऊंनी यासाठी विविध आकडेवीर व टक्केवारीही दिली असून त्यामुळे हे पुस्तक मुळातूनच वाचण्याची तसे संग्रही ठेवण्याची इच्छा होते. ‘महाराष्ट्राचा महाजनादेश’ सांगणारी ही निवडणूक आहे, तशीच महाराष्ट्राचा विरोधी पक्ष ठरवणारीही आहे आणि ते कसे हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे.


पुस्तकाचे नाव
: महाराष्ट्राचा महाजनादेश

लेखक : भाऊ तोरसेकर

प्रकाशक : मोरया प्रकाशन

आवृत्ती : ऑगस्ट २०१९ (प्रथम)

पृष्ठसंख्या : १५२

मूल्य : १५० रु.

@@AUTHORINFO_V1@@