समृद्ध समाज, मजबूत समाजाच्या संकल्पनेसाठी एकत्र या : स्वामी विद्यानंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2019
Total Views |



मुंबई : जगाच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १६ टक्के इतकी आहे. मात्र, जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत आपला हिस्सा केवळ तीन टक्के इतकाच आहे. अमेरिकेची लोकसंख्या ही जगाच्या चार टक्के इतकी आहे, मात्र, तिथली अर्थव्यवस्था ही जगाच्या २० टक्के इतकी आहे. ही तफावत कमी करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून 'वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम'तर्फे सातव्या जागतिक परिषदेची घोषणा करण्यात आली. शुक्रवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत 'वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम'चे संस्थापक आणि विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव स्वामी विद्यानंद यांनी या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी केले.

 

"केवळ राजकारणी आणि सरकारनेच नव्हे तर उद्योजक, प्रशासन, बॅंकर, व्यापारी आणि समाजातील प्रत्येक घटकाने अर्थव्यवस्था बळकटीकरण हे आपले दायित्व मानायला हवे," असेही ते म्हणाले. दि. २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान सांताक्रूझ येथील 'ग्रॅण्ड हयात' येथे होणाऱ्या ‘वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम’मध्ये १४ सत्रे असतील. ३७ देशांतील ३५४ परदेशी आणि देशांतर्गत ६५० प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. उद्योगक्षेत्रातील दिग्गज आणि धोरणकर्ते भारताला पाच दशलक्ष डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी उद्यमशीलतेची गरज व महत्त्व या विषयावर चर्चा करणार आहेत. 'समृद्ध समाज व मजबूत समाज', अशी या परिषदेची संकल्पना आहे.

 

या तीन दिवसीय परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी, पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल, इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. ए. एस. किरण कुमार, बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशीषकुमार चौहान, रेअर इंटरप्राइजचे राकेश झुनझुनवाला, एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार, टाटा सन्सच्या संरचना व संरक्षण तसेच एअरोस्पेसचे अध्यक्ष बनमाली अगरवाल, आदित्य बिर्ला ग्रुपचे मुख्य अर्थतज्ज्ञ अजित रानडे, झी एंटरटेन्मेंटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत गोएंका, महारेरा अर्थात महाराष्ट्र रिअर इस्टेट नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांसह अनेक मान्यवर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@