संदीप आसोलकर यांना 'आयकॉन ऑफ नवी मुंबई' पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2019
Total Views |




नवी मुंबई : एसएफसी इन्व्हायर्नमेंटल प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक संदीप आसोलकर यांना एका ख्यातनाम इंग्रजी दैनिकातर्फे 'आयकॉन ऑफ नवी मुंबई' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्पर्धेच्या युगात तडजोड न करता आपले ध्येय गाठणारा एक यशस्वी उद्योजक, अशी त्यांच्या कामाची ख्याती आहे. आपला व्यवसाय करताना पर्यावरण व्यवस्थेला धक्का लागू न देता उन्नती करणे हे ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवून आपली सेवा दिली आहे. नवी मुंबई शहरातील त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

  

एसएफसी इन्व्हायर्नमेंटल प्रा.लि. ही जागतिक पर्यावरण तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी असून महापालिका, नगरपालिका संस्थाना मलनिस्सारण, कचरा निर्मूलन आदी कामांसाठी यंत्रणा पुरवण्याचे काम करते. जल व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत एसएफसी इन्व्हायर्नमेंटल प्रा.लि. या कंपनीने नाविन्यपूर्ण संकल्पना, संशोधन, व्यावसायिक संकल्पना, जलसंवर्धन आदी क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले आहे. 'एससीएस'तर्फे जागतिक पातळीवर पाण्याच्या पुनर्वापर प्रक्रीयेत महत्वाचे योगदान आहे. या साऱ्याचे श्रेय संदीप आसोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जाते, त्यामुळेच कंपनीलाही विविध संस्थांमार्फत मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@