‘मेट्रोची गरज आणि शाश्वत विकास’ : प्रवीणसिंह परदेशी यांचे आज मालाडमध्ये व्याख्यान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2019
Total Views |




मुंबई
: शहरातील प्रसिद्ध आणि नामवंत ‘माय ग्रीन सोसायटी’ संस्थेच्यावतीने आज एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे‘मेट्रोची गरज-शाश्वत विकास’ या विषयावर हे विशेष व्याख्यान होणार असून यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी उपस्थित असणार आहेत.

मालाड पश्चिम येथील सुंदरनगर परिसरातील डी
. जी. खेतान शाळेच्या नवव्या मजल्यावरील सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. प्रस्तावित मेट्रो३ प्रकल्पाच्या कारशेडवरून ‘आरे’ चा मुद्दा सर्वत्र चर्चेत आहे. त्यामुळे आपल्या व्याख्यानात आयुक्त प्रवीणसिंह परदेशी ‘मेट्रोची गरज-शाश्वत विकास’ या विषयावर नेमकी कोणती मते मांडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यावेळी अधिकाधिक नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन ‘माय ग्रीन सोसायटी’ संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@