'पाकिस्तानात हिंदूंवरील अत्याचार कधी थांबणार ?'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2019
Total Views |



हिंदू खासदाराने पाकिस्तानच्या राष्ट्रीय विधानसभेत
उपस्थित केला प्रश्न


इस्लामाबाद
: पाकिस्तानमध्ये हिंदूंवरील अत्याचार सातत्याने वाढत आहेत. याविरुद्ध पाकिस्तानातील हिंदूंचा राग अनावर होत आहे. बुधवारी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभागृहात याचाच प्रत्यय आला. जेव्हा पीएमएल-एनचे खासदार (नॅशनल असेंब्लीचे सदस्य) खेल दास कोहिस्तानी यांनी गेल्या चार महिन्यांत २५-३० हिंदू मुलींचे अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती दिली. 


"पाकिस्तान सरकार कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. हिंदूंवरील हा अत्याचार कधी बंद होईल? किती काळ हिंदू लोकांचे मृतदेह आम्हाला पाहावे लागतील ? आमची मंदिर कधीपर्यंत जळत राहतील? याचे सरकारने उत्तर द्यावे," असे ते म्हणाले. सिंध प्रांतातील हिंदूंविरोधात सुरू असलेल्या षडयंत्रांवर कोहिस्तानी यांनी विधानसभेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या घटना केवळ सिंध आणि घोटकीमध्येच का घडत आहेत? हळूहळू ही आग संपूर्ण सिंधात पसरली जाईल. हे लवकरात लवकर थांबविले पाहिजे. सिंधमध्ये असे काही लोक आहेत ज्यांना अटक करण्याची गरज आहे. त्या लोकांची ताकद तपासणे ही सरकारची जबाबदारी आहे.



पुढे ते म्हणाले
,  "नम्रता चांदनी या हिंदु वैद्यकीय विद्यार्थ्याची सिंधमधील लारकाना जिल्ह्यातील वसतिगृहात नुकतीच हत्या करण्यात आली. त्याआधी दोन दिवसांपूर्वी, लारकाना जिल्ह्यातील घोटकी येथील हिंदू मुख्याध्यापिका नूतन दास यांच्यावर आरोप केले. शाळा, मंदिरे, धर्मशाळा आणि हिंदूंच्या मालमत्तेची तोडफोड केली. पोलिसांनी फक्त तमाशा पहिला. या घटनेनंतर घोटकीमध्ये शांतता आहे, हिंदू समाजातील लोक घाबरले आहेत. खरं तर, घोटकी भागात हिंदू मुलींचे अपहरण केले जात आहे आणि त्यांना धर्मांतर करून मुस्लिम वयस्कांशी लग्न करण्यास भाग पाडले जात आहे. त्यामागील मुस्लिम धर्मगुरू मियां मिठू आहेत. जो संपूर्ण परिसरातील हिंदूंचे सक्तीने धर्मांतर करण्याचे षडयंत्र राबवित आहे." 

@@AUTHORINFO_V1@@