चिदंबरम यांचा तिहारमधील मुक्काम वाढला

    19-Sep-2019
Total Views |



नवी दिल्ली
: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी चिदंबरम यांना अटक करण्यात आली होती. आज चिदंबरम यांना येथील राउज एव्हेन्यू संकुलातील कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे चिदंबरम यांचा तिहारमधील मुक्काम वाढला आहे.


सीबीआयने चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. चिदंबरम यांची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनी सीबीआयच्या मागणीला विरोध दर्शवला. कपिल सिब्बल यांनी याचिका करत चिदंबरम तिहार जेलमध्ये असेपर्यंत रोज वैद्यकीय तपासणी करण्याची तसंच पुरेसा पूरक आहार दिला जावा अशी मागणी केली. चिदंबरम अनेक आजारांनी त्रस्त असून
, कोठडीत असताना त्यांच्या वजनात घट झालं असल्याचं यावेळी त्यांनी न्यायालयात सांगितलं. त्यामुळे यावर सुनावणी करताना विशेष न्यायमूर्ती अजय कुमार यांनी चिदंबरम यांची वैद्यकीय तपासणी करण्याची परवानगी दिली.