बीडमध्ये पवार उभे राहिले तरी 'कमळ' फुलेल : पंकजा मुंडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2019
Total Views |


 
 


नाशिक : महाजनादेश यात्रेच्या समारोपानिमित्त महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना थेट आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने बीडमधील उमेदवारांची यादी घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. "शरद पवार स्वतः जरी बीडमध्ये उभे राहीले तरीही येथे कमळच फुलेल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केले.

 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रात जातीपातीचे विष पेरले. मोदी सरकारच्या काळात गोरगरीबांचा विकास करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक विषमता नष्ट करून खऱ्या अर्थाने सामाजिक स्वच्छता केली, असे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांच्या यादीबद्दल त्या म्हणाल्या, "आम्हाला आमच्या विजयाची खात्री आहे परंतू, विरोधकांनाच आमची धास्ती आहे.", असा टोला त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला लगावला.

 

"मी परळीतून निवडून आली आहे. मला कुणाची धास्ती नाही. लोकसभेला राष्ट्रवादीचा आम्ही दारूण पराभव केला. माझ्या मतदार संघातही त्यांची पिछेहाट झाली. गेल्या पाच वर्षांत विकासनिधी आणून मतदार संघात आम्ही अनेक विकासकामे केली आहेत.", असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

@@AUTHORINFO_V1@@