"मी आज धन्य झालो" शिवछत्रपतींच्या वंशजांनी माझ्या मस्तकावर छत्र ठेवले : पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2019
Total Views |



नाशिक : महाजनादेश यात्रेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या भाषणासाठी शहरातील अबालवृद्धांनी एकच गर्दी केली होती. यावेळी एका प्रसंगाने साऱ्यांचीच मने जिंकली. मंचावर भाजपच्या दिग्गज मंडळींसह मंत्री आदी मान्यवरही उपस्थित होते. नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसलेही यावेळी मंचावर उपस्थित होते.



 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना उदयनराजेंचा विशेष उल्लेख केला. उदयनराजी यांनी आपल्या पदाचा त्याग करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व स्वीकारले, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले, असे उद्गार त्यांनी काढले. आपल्याला यंदाच्या निवडणूकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचही साथ मिळाल्याचे ते म्हणाले.

 

दरम्यान, उदयनराजे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष स्वागत केले. महाराजांच्या मावळ्याची पगडी मोदींना परिधान करून त्यांचा सत्कार केला. उदयनराजेंना सन्मान देत छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आमच्यासोबत असल्याचेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हात उंचावत त्यांनी स्वागत केले.

 

नरेंद्र मोदी म्हणाले, "खुद्द शिवछत्रपतींच्या वंशांनी माझ्या डोक्यावर छत्र ठेवले आहे. हा अनुभव माझ्यासाठी विशेष आहे. माझ्या आयुष्यातील हा क्षण बहुमुल्य मानतो. हा सन्मानही आहे आणि महाराजांच्या प्रति दायित्वाचे प्रतिकही आहे. "

@@AUTHORINFO_V1@@