स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील ट्विट भोवणार : मुंबई पोलीस करणार राहुल गांधींची चौकशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2019
Total Views |


मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधात राहुल गांधी यांनी केलेले ट्विट त्यांना चांगलेच भोवणार आहे. मुंबईतील भोईवाडा सत्र न्यायालयाने राहुल गांधींची या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी राहुल गांधी गैरहजर राहिले होते. त्यामुळे हे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर संस्थानतर्फे करण्यात आलेल्या दाव्यानुसार, कलम २०२ अंतर्गत मुंबई पोलीसांना हे आदेश देण्यात आले आहेत.

 

२०१६ मध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात टिपण्णी केली होती. यानंतर संस्थानतर्फे रणजित सावरकर यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बदनामीचा आरोप करत राहुल गांधींविरोधात कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत याचिका दाखल केली होती.

 

याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींच्या अनुपस्थितीमुळे भोईवाडा दंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान राहुल गांधी यापूर्वीच काही प्रकरणांमध्ये मुंबईतील न्यायालयांच्या चकरा मारत आहेत. रा.स्व.संघाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याविरोधात त्यांना जामिन मिळाला आहे. दरम्यान, आता या प्रकरणावर न्यायालय कारवाईचे आदेश देऊ शकते.

@@AUTHORINFO_V1@@