'लूटकेस' चित्रपटाचा घटनात्मक ट्रेलर प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2019
Total Views |


राकेश कृष्णन दिग्दर्शित लूटकेस या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. पैशांनी भरलेली एक सुटकेस आणि त्या पैशाच्या हव्यासापोटी अडकलेले अनेक लोक यांच्या कचाट्यातून सुटून अखेर सुटकेस कोण लुटून घेऊन जाते हा सगळा प्रवास या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलाय. ट्रेलर पाहताना प्रेक्षकांना एकदाही पापणी मिटण्याची संधी मिळणार नाही इतक्या जलद गतीने घाटाने घटना घडताना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हा ट्रेलर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. मात्र आता चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अशीच छाप पाडण्यात यशस्वी होतो का हे पाहणे खूपच औत्सुक्याचे ठरेल.

विशेष म्हणजे या चित्रपटात अनेक कलाकार बऱ्याच दिवसांनी सिल्व्हर स्क्रीनवर झळकणार आहेत. कुणाल खेमू, रणवीर शौरी, रसिका डुगल, गजराज राव, विजय राझ असे अनेक नावाजलेले कलाकार या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

दरम्यान या लूटकेसचा प्रवास ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

@@AUTHORINFO_V1@@