लता मंगेशकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली सावरकरांवरील श्रद्धा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2019
Total Views |


 

भारतरत्न लता मंगेशकर यांनी आज सावरकरांविषयीची एक आठवण चाहत्यांसोबत शेअर केली. ही आठवण आज सांगण्याचे प्रयोजन म्हणजे 'सन्यस्त खड्ग' या नाटकाचा पहिला प्रयोग १९३१ साली आजच्याच दिवशी झाला होता. लता दीदींनी याविषयी बोलताना, "सावरकरांचे आणि मंगेशकर कुटुंबियांचे घरोब्याचे संबंध होते. म्हणूनच त्या काळी सावरकरांनी माझ्या बाबांच्या नाटक कंपनीसाठी हे नाटक लिहिले. त्या नाटकातील 'शत जन्म शोधताना' हे एक गाणे प्रचंड लोकप्रिय झाले." अशी आठवण प्रेक्षकांसोबत शेअर केली. त्याचबरोबर नाट्यगीताची लिंक देखील श्रोत्यांसाठी पोस्ट केली.

 

दरम्यान यापूर्वी देखील सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून लता दीदींनी वीर सावरकरांच्या आठवणींना उजाळा दिला होता. "सावरकर यांची आज जयंती. त्यानिमित्त मी त्यांचे व्यक्तित्व आणि देशभक्तीला प्रणाम करते. सावरकरांची देशभक्ती आणि स्वाभिमान याची कल्पनाही नसलेले काही लोक आजकाल सावरकरांना विरोध करत आहेत." असे मत त्यांनी व्यक्त केले होते. तर सावरकरांची एक कविता आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी व्यक्त केलेले सावरकरांविषयीचे विचार ट्विटरच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले होते. 



 

त्यानंतर आज पुन्हा एकदा लता दीदींनी आपली सावरकरांवरची श्रद्धा आणि आत्मीयतेची भावना व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

@@AUTHORINFO_V1@@