'Google For India' सोहळा संपन्न : वाचा भारतीयांसाठी काय अभिमानास्पद !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2019
Total Views |
 


Google Assistant वर दुसरी मोठी भाषा हिंदी

 

गुगलने आज 'Google For India' या कार्यक्रमात कित्येक सेवांचा शुभारंभ केला. भारताला समोर ठेवूनच या सेवा सुरू करण्यात येणार आहेत. यात डिजिटल पेमेंट, व्हॉइस असिस्टंट, टुल्स, नोकरी शोधणारे अॅप, अशा सेवांची घोषणा करण्यात आली. व्यापाऱ्यांसाठी बिझनेस गुगल पे लॉन्च करण्यात आले आहे. गुगल पेनुसारच युपीआयच्या मदतीने हे अॅप काम करणार आहे. सध्या गुगल पेचे सहा कोटी युझर्स आहेत.



 

 

डिजिटल कार्ड

गुगलने एक टोकनाइज्ड कार्ड सुरू केले आहे. एका डिजिटल कार्ड क्रमांकाद्वारे पेंमेंट केले जाणार आहे. तसेच दोन हजार रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी पासवर्डचीही गरज नाही. गुगलने आता जॉब्स स्पॉट नामक टुल्सही सुरू केले आहेत. त्यात सेवा, तंत्रज्ञान, उत्पादन आदी क्षेत्रातील नोकऱ्यांची सेवा मिळू शकणार आहे.




 

 

आर्टीफिशिअल इंटेलिजन्स रुम

गुगल फॉर इंडिया २०१९ मध्ये आर्टीफिशिअल इंटेलिजन्सवरही भाष्य केले आहे. बंगळूरू स्थित आर्टीफिशिअल लॅब (AI Lab) सुरू करण्याचाही विचार केला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स लॅबद्वारे पूरस्थितीचा धोक्याची घोषणा करण्याचे काम पटना येथे केले जाणार आहे.

 

गुगल हिंदी

या सोहळ्यात गुगलने हिंदीवर ज्यास्त लक्ष केंद्रीत केले आहे. पूर्वीपेक्षा आता जास्त हिंदीत मजकूर शोधत असतात. त्यासाठी भारतातील सर्च रिझल्टमध्ये बदल केला जात आहे. भारतीय भाषांनाही आता शोधामध्ये विशेष महत्व दिले जाणार आहे.

 

गुगल Discover

गुगल फॉर इंडिया २०१९ मध्ये प्रत्येक टॅबमध्ये विविध भाषांमध्ये मजकूर शोधण्यासाठी कस्टमाइझ पर्याय देण्यात येणार आहे. यात विविध पर्याय निवडून तुम्ही तुमच्या आवडीनुसार, मजकूर शोधू शकणार आहात. ही सेवा Google Chrome, Google Go आणि Google Search या तिन्हीमध्ये दिसेल.



 

 
 

· भारतात बाराशेहून अधिक युट्य़ूब क्रिएटर्स आहेत. त्या प्रत्येकाला दहा लाखांहून अधिक सबस्क्राईबर आहेत.

· भारतात BHIM UPI चा वापर क्रेडिट कार्डपेक्षा जास्त केला जात आहे.

· गुगल वायफाय चारशे स्थानके आणि चार हजारपेक्षा जागांमध्ये बसवण्यात आले आहे.

· इंटरनेट सारथीच्या माध्यमातून ८० हजार रेल्वेगाड्या आणि तीन लाख खेड्यात इंटरनेट सेवा पोहोचली आहे.

· आर्टफिशिअल इंटिलिजन्समध्ये दहापटीने अधिक प्रमाणावर हिंदी भाषेचा वापर वाढला

· discover tab मध्ये इंग्रजी आणि हिंदीशिवाय अन्य सात भाषांचाही सामावेश

· Google Lens मध्ये हिंदी आणि इंग्रजीसह मराठी, तमिळ, कन्नड, तेलुगु आदी भाषांचाही सामावेश

· Google Bolo App द्वारे आपल्या आवाजापासून अनेक गोष्टी शिकता येणार आवाजापासून अनेक गोष्टी शिकता येणार

· Google Bolo App भारतातील हिंदीशिवाय मराठीसह अन्य पाच भाषामध्ये विना इंटरनेट सुरू असणार आहे.

· Google Bolo App यामध्ये तीस लाखांहून अधिक गोष्टी ऐकल्या जाऊ शकतात.

@@AUTHORINFO_V1@@