सर्वाधिक गाढव पाकिस्तानातच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2019
Total Views |


 

इस्लामाबाद : जगभरात दहशदवादी देश अशी ओळख असणाऱ्या पाकिस्तानची आता पुन्हा एक नवीन ओळख बनवली आहे. जगभरात दहशतवाद्यांचा पुरवठा झाल्यानंतर पाकिस्तान आता गाढवांचा प्रदेश म्हणून प्रथम क्रमांकाचा देश बनला आहे. वर्ल्ड इंडेक्सच्या ताज्या अहवालानुसार, जगातील सर्व देशांमध्ये पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या सर्वाधिक आहे. पण गाढवांच्या संख्येच्या बाबतीत पहिल्या दहा देशांमध्ये फक्त मुस्लिम देशच आहेत. ज्यामध्ये तुर्की, मोरोक्को आणि मलेशिया सारख्या देशांचा समावेश आहे.

दुसऱ्या एका अहवालानुसार, पाकिस्तानची ढासळणारी अर्थव्यवस्था फक्त गाढवामुळे टिकली आहे. याचा संदर्भ असा कि, पाकिस्तानच्या ग्रामीण व शहरीभागात वाहतुकींसाठी गाढवांचा वापर केला जातो. अगदी सार्वजनिक वाहतुकीसाठीही गाढवांना पसंती दिली जाते.



 

जानेवारी २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पाकिस्तानने चीनला गाढवे विकून आपली अर्थव्यवस्था हाताळली आहे. खरं तर, गाढवाची कातडी आणि हाडे यांपासून पारंपारिक औषधे चीनमध्ये बनविली जातात. या व्यतिरिक्त, आधुनिक अन्न उद्योगातील प्रसिद्ध ‘इंग्रेडीएंट जिलेटिन’ हे देखील गाढवाच्या हाडांपासून बनविलेले आहे. तर चीनला गाढव पुरवून पाकिस्तान बरेच डॉलर्स कमवत आहे. वाहतुकींसाठी होणार गाढवांचा वापर ठीक आहे, पण चीनला गाढव विकून पाकिस्तला आपली अर्थव्यवस्था सांभाळण्याची वेळ आता आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@