पश्चिम बंगालचे नाव बदलणार ? : वाचा नेमकं काय घडलं मोदी-दीदी भेटीमध्ये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2019
Total Views |
 


नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी बंगालचे नाव बांगला करा, अशी मागणी त्यांनी केली. नवरात्रीनंतर पश्चिम बंगालला भेट देण्याचे निमंत्रणही त्यांनी मोदींना दिले आहे.

 

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वाद शिगेला पोहोचला होता. कोलकत्यात रंगलेल्या नाट्यामुळे साऱ्यांचा नजरा आज मोदी आणि ममता यांच्या भेटीकडे लागून होत्या. दरम्यान, दीदींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुर्ता आणि बंगाली मिठाई भेट म्हणून दिली.

 

पंतप्रधान मोदींनीही पश्चिम बंगालचे नाव बदलण्याचे आश्वासन दिल्याचे ममता यावेळी म्हणाल्या. बंगालसाठी १३ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. एनआरसी आणि अन्य मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचे त्या म्हणाल्या.

 

मोदींबरोबरची आजची भेट ही राजकीय भेट नव्हती, असे सांगत त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, वेळ मिळाल्यास शाह यांची गुरुवारी भेट होणार आहेत. मोदींना नवरात्रीनंतर पश्चिम बंगालमध्ये येण्यासाठी तसेच जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या कोळसा खाणीच्या उद्घाटनाचेही निमंत्रण त्यांना देण्यात आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@