सावधान : मुंबईत पडणार मुसळधार, स्कायमेटकडून रेड अलर्ट जारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2019
Total Views |



मुंबई : गणपतीच्या आठवड्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसानंतर काही दिवस मुंबईसह महाराष्ट्रात रिमझिम सरी पडत होत्या. परंतु, स्कायमेटच्या अंदाजानुसार मुंबईसह राज्यभरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार असे सांगितले आहे. येत्या ७२ तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यानंतर प्रशासनही तयारी लागले आहेत.

 

मुंबईमध्ये गेले काही दिवस सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे जागोजागी पाणी साठल्यामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई तर होणार नाही ना? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि उत्तर तेलंगणाच्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मध्य प्रदेश, पूर्व आणि मध्य उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, मराठवाडा, उत्तर कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि उर्वरित तेलंगणा भागांमध्ये पाऊस पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

@@AUTHORINFO_V1@@