रमेश पतंगे लिखित ‘समरसतेचा वाटसरू’ पुस्तकाचे प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2019
Total Views |




पिंपरी
: ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासू लेखक रमेश पतंगे लिखित ‘समरसतेचा वाटसरू’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. ‘गुरुकुलम् प्रकाशन’ने हे पुस्तक प्रकाशित केले. ’गुरुकुलम् प्रकाशना’चे हे पहिलेच पुस्तक आहे. वैचारिकतेतून निर्माण झालेली सामाजिक समरसता आणि त्या समरसतेची गरज आपल्याला या पुस्तकातून अभ्यासायला मिळतेराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहसंपर्क प्रमुख मिलिंद देशपांडे, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, लेखक रमेश पतंगे, ‘विवेक’ संस्थेचे प्रदीप गुप्ता, कार्यवाह अ‍ॅड. सतीश गोरडे, सहकार्यवाह रवी नामदे यांच्या हस्ते या पुरस्काचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी चापेकर स्मारक समितीचे सदस्य, शिक्षक, शहरातील लेखक व अभ्यासक यावेळी उपस्थित होते.



यावेळी गिरीश प्रभुणे म्हणाले की
, “रमेश पतंगे यांच्या जीवनात समरसता प्रत्येक क्षणात आढळते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अनेक नवीन विषय मांडून त्यांनी संघाची वैचारिक जडणघडण केली आहे. ‘समरसतेचा वाटसरू’ या पुस्तकातून संघ विचारांचे दर्शन घडते. संघ विचार म्हणजे केवळ एकाच विशिष्ट जाती-धर्मावर आधारित नसून इथे प्रत्येक जाती, धर्माला सामान स्थान आहे. ही समरसता पतंगे यांनी या पुस्तकातून मांडली आहे.”



“गुरुकुलम् प्रकाशनची दिशा सुरुवातीपासून ठरलेली आहे. कथात्मक आणि केवळ मनोरंजनाची पुस्तके या प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित होणार नाहीत, तर वैचारिक साहित्यातून नवीन समाज घडवणारी पुस्तके ‘गुरुकुलम् प्रकाशना’च्या माध्यमातून प्रकाशित केली जाणार आहेत,” असेही प्रभुणे म्हणाले. ‘समरसतेचा वाटसरू’ या पुस्तकाचे लेखक रमेश पतंगे म्हणाले की, “समरसता आणि समता याबाबत समाजात सध्या अनेक मतमतांतरे आहेत. या दोन शब्दांना जातीधर्माची किनार दिली जाते. त्यामुळे हे शब्द समजून घेणे आणि ते समाजासमोर मांडणे ही आपली जबाबदारी आहे. त्यातून ‘समरसता’ या शब्दावर लिखाणाचा प्रवास सुरू झाला. काही लोक स्वतःला प्रकांड पंडित म्हणून घेतात. त्यांच्या डोक्यातील हवा काढण्यासाठी हे पुस्तक उपयोगी पडेल. समाजातील सर्व भागातील संदर्भ देत या पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे.”



रमेश पतंगे यांनी पुस्तकाची रॉयल्टी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्ला देण्यात येत असल्याची घोषणा यावेळी केली
. पैसे मिळवण्यासाठी या पुस्तकाचे लिखाण केले नसून सामाजिक जडणघडणीत आपली भूमिका मांडण्यासाठी व समाजाला प्रेरणा देण्यासाठी या पुस्तकाचे लिखाण करण्यात आले असल्याचेही पतंगे यांनी सांगितले. अ‍ॅड सतीश गोरडे म्हणाले की, “समरसतेचा वाटसरू हे पुस्तक अनुभवात्मक, आत्मचिंतक आहे. या पुस्तकाने आम्हाला संघसाक्षर केले. या पुस्तकामुळे संघाबद्दल असणारे पूर्वग्रह निघून गेले आणि आदर तयार झाला. धर्म आणि जातीचे जोडे बाहेर ठेवून पुस्तक वाचायला हवे. एका वळणावरून सुरू झालेला प्रवास विज्ञाननिष्ठ विचारांची कास धरून, जाती निर्मूलन आणि समरसता येथे थांबतो. एक अंतर्मुख करायला लावणारे अनुभव प्रदान करणारे पुस्तक असून हे पुस्तक म्हणजे संघाची समरसतेची गाथा असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.” यावेळी पुस्तक परिचय मनोगत मंजुषा गोडसे, सुनीता घोडे व अ‍ॅड. दीपाली गाडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन मधुसूदन जाधव, अशोक पारखी, गतिराम भोईर, नितीन बारणे, लक्ष्मण पवार, नीता मोहिते, प्रधानाचार्य पूनम गुजर, सिद्धेश्वर इंगळे, डॉ. सोमनाथ सलगर आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता जोशी यांनी तर आभार प्रदर्शन असाराम कसबे यांनी केले.

@@AUTHORINFO_V1@@