एलआयसीमध्ये मेगाभरती : जाणून घ्या... कसा कराल अर्ज ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2019
Total Views |


 


पुणे : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) 'असिस्टंट क्लार्क' या पदासाठी मेगाभरती जाहीर केली आहे. देशभरात 'एलआयसी'च्या विविध कार्यालयांत सुमारे आठ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. मुख्य म्हणजे एलआयसीमध्ये अशाप्रकारे २४ वर्षांनंतर भरती करण्यात येत आहे.

 

'असिस्टंट क्लार्क' या पदासाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. पदासाठी वयोमर्यादा १८ ते ३० एवढी आहे. नियमानुसार मागासवर्गीयांसाठी वयाची सवलत आहे. कोणत्याही विषयातील पदवी ही किमान शैक्षणिक पात्रता आहे. पूर्व परीक्षेसाठी रिझनिंग अॅबिलिटी, न्यूमेरिकल अॅबिलिटी आणि इंग्रजी अशा तीन विषयांची परिक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल.

 

बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे असे परीक्षेचे स्वरूप आहे. या परीक्षेसाठी संपूर्ण देशात परीक्षा केंद्रे असून, महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, पणजी आदी परिक्षा केंद्र उपलब्ध आहेत. इच्छुकांना १ ऑक्टोबर २०१९ पर्यंत www.licindia.in/careers या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@