आनंदवार्ता : विनेश फोगाटला ऑलिम्पिकचे तिकीट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2019
Total Views |



नवी दिल्ली : भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केली आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी विनेश फोगाट ही भारताची पहिली कुस्तीपटू ठरली. तिने कझाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत ५३ किलो वजनी गटाच्या रॅपेचेज फेरीत अमेरिकेच्या सारा एनवर मात करुन ऑलिम्पिक कोटा मिळवला. आता कांस्यपदकासाठी विनेशची लढत बुधवारी रात्री ग्रीसच्या मारिया प्रिओलाराकीसोबत होणार आहे.

 

यापूर्वी अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रांटचा ८-२ने पराभव करून विनेश कांस्य पदकासाठी पात्र ठरली होती. साराने गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये ५३ किलो वजनी गटात रजत पदक पटकावले होते. या आधी विनेशला जापानच्या मायू मुकैदाने पराभूत केले होते. त्यामुळे जागतिक कुस्ती चॅम्पियनशीपमधून तिला बाहेर पडावं लागलं होतं. मात्र तिला नशीबाने साथ दिली आणि रेपेचेज राऊंडमध्ये पदक मिळविता आलं. त्यामुळे २०२०मध्ये प्रवेश मिळणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली आहे.

@@AUTHORINFO_V1@@