
भारत आणि दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज मोहाली येथे खेळवला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. आजच्या सामन्यासाठी शिखर धवनचा नेटमधील सर्वच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. #TeamIndia opener @SDhawan25 sweating it out in the nets ahead of the 2nd T20I against South Africa.#INDvSA pic.twitter.com/ibvu9WXT9h
तीन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. या सामन्याच्या तिकिटांचा परतावा उद्यापासून दिला जाणार आहे. या सामन्यात नाणेफेक देखील झाली नसल्याने प्रेक्षकांना तिकिटांचे पैसे परत दिले जाणार असल्याचे हिमाचल क्रिकेट संघटनेने सांगितले.
दरम्यान सध्या सुरु असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेविषयी काल झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोर यांनी हा सामना आगामी वर्षातील टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने महत्वाचा असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे आता या मालिकेतील टीम इंडीआयच्या कामगिरीनुसार आगामी सामन्यांमध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करू शकेल का हा अंदाज लावता येईल.
Upcoming T20Is will help in preparation for 2020 T20 World Cup, reckons #TeamIndia batting coach Vikram Rathour pic.twitter.com/lPcVDPrpW2
— BCCI (@BCCI) September 17, 2019