देशाच्या सन्मानासाठी सावरकरांना भारतरत्न द्या : उद्धव ठाकरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2019
Total Views |




मुंबई
: ‘’स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व कुणाला मान्य नसेल, पण त्यांच्या देशभक्तीची तुलनाच होऊ शकत नाही. त्यांची क्रांती रक्तरंजित किंवा दहशतवादी नव्हती, तर विधायक हिंसेची होती आणि ती झाली नसती तर इतिहास वेगळाच निर्माण झाला असता. असे स्वातंत्र्यवीर हे आपल्याला अद्याप समजलेच नाही, ही शोकांतिका आहे. भारतात जन्माला आलेली रत्ने कोणती, याबाबत जगात देशाची ओळख निर्माण होण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळालेच पाहिजे,” असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुढाकाराने लेखक विक्रम संपत लिखित ‘सावरकर : इकोज फ्रॉम ए फर्गोटन पास्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, खा. राहुल शेवाळे, माजी खासदार डॉ. भारतकुमार राऊत, आ. सदा सरवणकर, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर तसेच पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.


इंग्रजी साहित्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर इतक्या उशिरा येणे ही दुर्दैवाची बाब आहे
. याला कारण म्हणजे काँग्रेसचा त्यांच्याबद्दल असलेला तिटकारा. त्यामुळेच आता लोकप्रतिनिधींनाही सावरकर अवगत करण्यासाठी त्यांच्याविषयीची व्याख्याने विधिमंडळात आयोजित करण्याचा मनोदय विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केला. “सावरकरांना विरोध हा काँग्रेसच्या हतबल मनोवृत्तीचे प्रतीक आहे. पायाखालची वाळू सरकू लागल्याची जाणीव होऊ लागल्याने त्यांनी सावरकरांना देशद्रोही संबोधिण्यात सुरुवात केली, पण आता सावरकरांचा इतिहास बिगरमराठी भाषिकांपर्यंत पोहोचविण्याची पोकळी हे पुस्तक भरून काढेल,” असा विश्वास स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केला.

@@AUTHORINFO_V1@@