महाजनादेश यात्रेचे नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2019
Total Views |



नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निघालेली महाजनादेश यात्रा बुधवार, दि. १८ रोजी नाशिकमध्ये दाखल झाली. यावेळी पाथर्डी फाटा येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रथावर स्वार होत उपस्थित जनतेचे अभिवादन स्वीकारले. यावेळी त्यांच्यासमवेत रथावर पालकमंत्री गिरीश महाजन, खा. भूपेंद्र यादव, आ. देवयानी फरांदे, आ. सिमा हिरे, आ. बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, भाजप प्रदेश सरचिटणीस लक्षमण सावजी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भाजपच्यावतीने भव्य बाईक रॅली व रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिककर नागरिकांनी तोबा गर्दी केल्याचे दिसून आले. भव्यदिव्य रांगोळी, आसमंतात फडकणारे पक्षाचे ध्वज, 'भारत माता की जय' घोषणेचा पुकार यामुळे यात्रामार्गावर नवचैतन्य संचारल्याचे पाहावयास मिळाले. यात्रेच्या निर्धारित वेळेपूर्वीच नागरिक व भाजप कार्यकर्ते यांनी स्वागतासाठी शहराच्या विविध चौकांमध्ये गर्दी केल्याचे यावेळी दिसून आले. यावेळी रविवार कारंजा परिसरात दाखल झालेल्या महाजनादेश यात्रेचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. या ठिकाणी नाशिकमध्ये राहत असलेल्या अन्य प्रांतांतील सुमारे १५ भाषिक नागरिकांतर्फे मुख्यमंत्र्यांचा पारंपरिक वाद्यगजरात, म्हणजेच केरळचे 'पंचवाद्य' व दाक्षिणात्य पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले. यामध्ये केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब, उत्तरांचल, दिल्ली आदी राज्यातील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

 

महाजनादेश यात्रेत आ. बाळासाहेब सानप, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, भाजपचे पवन भागुरकर, शहराध्यक्ष गिरीश पालवे, शशिकांत जाधव, प्रदीप पेशकार, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, नगरसेविका हिमगौरी आडके, विजन साने, अजिंक्य साने, संभाजी मोरुस्कर आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

सुरक्षेच्या करणास्तव संभाव्य आंदोलकांना केले स्थानबद्ध

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान आंदोलन करण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाच्यावतीने संभाव्य आंदोलकांना स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यांना देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नजर कैदेत ठेवण्यात आले होते.

 

तीनही मतदारसंघांतून गेली यात्रा

 

नाशिकमध्ये दाखल झालेली महाजनादेश यात्रा नाशिक पूर्व, मध्य आणि पश्चिम या तीनही मतदारसंघांतून गेली. त्यामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण आगामी काळात कसे असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून आले.

 

यात्रेचा मार्ग

 

पाथर्डी फाटा-सावता नगर-सिटी सेंटर मॉल-त्र्यंबक नाका-शालीमार-गाडगे महराज पुतळा-मेनरोड- रविवार कारंजा-मालेगाव स्तंभ-पंचवटी कारंजा

@@AUTHORINFO_V1@@