विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये ४ कुस्तीवीर उपांत्यपूर्व फेरीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2019
Total Views |


 

नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा बॉक्सिंगपटू अमित पांघलने विश्व कुस्ती चॅम्पियनशीपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. त्याच्यासह भारताच्या चार बॉक्सिंगपटूंनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याबरोबर, कवींदरसिंग बिश्त याने ५७ किलो, मनीष कौशिकने ६३ किलो आणि संजीत याने ९१ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे.

 

अमितने तुर्कीच्या बटूहान सिटफसीला ५-० ने पराभूत केले. अमितने या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. आपल्या पहिल्या जागतिक पदकाच्या प्रतिक्षेत दुसऱ्या सीडेड अमितने सिटफसीला ३०-२७, ३०-२७, ३०-२७, ३०-२७, ३०-२७, असे हरवले. पुढच्या फेरीत २३ वर्षीय अमितचा सामना फिलिपिनो कार्लो पालमशी पडणार आहे.

 

६३ किलो वजनी गटात मनीषने मोंगोलियाच्या चौथ्या मानांकित चिनझोरिग बाटारसुखचा ५-० असा सहज पराभव केला. तर, ९१ किलो वजनी गटात संजीतने उझबेकिस्तानच्या द्वितीय मानांकित संजर टुर्सुनोव्हचा ३-२ असा पराभव केला. तसेच, ६७ किलो वजनी गटात कविंदरने फिनलँडच्या अर्सलान खाटीव्हचा ३-२ असा पराभव केला.

@@AUTHORINFO_V1@@