पुन्हा काँग्रेससोबत युती... नको रे बाबा ! : देवेगौडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2019
Total Views |



नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये जर पोटनिवडणूक झाल्या तर त्यामध्ये जनता पक्ष सेक्युलर (जेडीएस) स्वतंत्र लढणार असल्याची माहिती जेडीएसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी दिली. तसेच, पुन्हा काँग्रेससोबत युती करणार नसल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

 

"राज्यात जर पोटनिवडणूक झाल्या तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. पुन्हा काँग्रेससोबत युती करण्याची चूक करणार नाही." असे त्यांनी सांगितले. कर्नाटकमधील युतीचे सरकार पडल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएस एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. बंड पुकारलेल्या १७ आमदारांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडणार असून ती जेडीएस स्वतंत्र लढणार असल्याचा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.

@@AUTHORINFO_V1@@