खळबळजनक ! पाकिस्तानातील २६ लाख लोकांना नागरिकत्वच नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2019
Total Views |



नागरिकत्वापासून वंचित २६ लाख पाकिस्तानी नागरिकांना सामाजिक आणि राजकीय हक्क नाहीत.


इस्लामाबाद
: पाकिस्तानमध्ये वारंवार मानवी हक्काची पायमल्ली केली जात असल्याची टीका संयुक्त राष्ट्रांमध्ये होते. याचेच एक उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे. पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात राहणाऱ्या अंदाजे २ लाख स्त्रियांकडे राष्ट्रीय ओळखपत्र (एनआयसी) नाही, त्यामुळे देशातील कोणत्याही सामाजिक व राजकीय कार्यात सहभागी होण्याचा त्यांना हक्क नाही.


ट्रस्ट फॉर डेमोक्रॅटिक एज्युकेशन अँड अकाऊंटॅबिलिटी (टीडीईए)ने तयार केलेल्या आकडेवारीनुसार
,अंदाजे २६लाख वंचित महिलांपैकी १०,००,००० महिला स्वाबी, तर ७०००० एबटाबाद आणि ९०००० महिला बाजौरमध्ये राहतात. टीडीडीएने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तान बरपख्तुनख्वा मधील २६ लाख महिलांना नागरिकत्व नाही नसल्याचे समोर आले. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये त्यांच्या भूमिका घेण्याच्या क्षमतेवर निर्बंध आहेत. त्या सार्वजनिक, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण आणि आरोग्य या सेवांचा लाभ घेण्यास असमर्थ आहेत.

 

 

पाकिस्तानमधील नागरिकांना मतदान करण्यास
, राजकीय पक्षांची सदस्यता घेण्यास, सरकारी कल्याणकारी योजनांमध्ये आणि रुग्णालये, शिक्षण आणि बँकांसह सेवांमध्ये प्रवेश घेण्यास राष्ट्रीय ओळखपत्र पात्र ठरविते. हे ओळखपत्रच नसल्याने या महिला सार्वजनिक जीवनात भाग घेण्यास व देशातील पूर्ण नागरिक होण्यापासून वंचित आहेत. यावरून पुन्हा एकदा पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाच्या नियमांची पायदळी तुडवले असल्याचे दिसून येते.
@@AUTHORINFO_V1@@