
ह्युमन कॉप्युटर म्हणून सर्वपरिचित असलेल्या शकुंतला देवी यांच्यावरील जीवनपटाविषयी काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली आणि प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली. आज या चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि एक छोटीशी झलक प्रदर्शित करण्यात आली आहे. विद्या बालन या चित्रपटात शकुंतला देवी यांची भूमिका साकारणार आहे.
अनु मेनन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. शकुंतला देवी यांना जगभरातून अनेक लोकांनी वेगवेगळ्या उपाध्या दिल्या. त्यांची बुद्धिमत्ता, गणितातील चातुर्य, विलक्षण व्यक्तिमत्व अशी अनेक विशेषणे त्यांना लोकांपासून मिळत असत. अशा या बुद्धिमान व्यक्तीचे चित्रण विद्या बालनच्या रूपाने आपल्याला नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये आणि व्हिडीओमध्ये दिसून येईल.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण शकुंतला देवी यांना चपखल बसते त्यामुळे त्यांची ही कथा पाहण्यास सर्वच जण उत्सुक आहेत.
She was extraordinary, in every sense of the word! Know the story of the child prodigy & the human computer, #ShakuntalaDevi
— vidya balan (@vidya_balan) September 16, 2019
@sonypicsprodns @Abundantia_Ent @anumenon1805 @vikramix @SnehaRajani pic.twitter.com/P2PAqPp5Tt