पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त 'सेवा सप्ताह'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2019
Total Views |



निता लाड यांच्या उपक्रमास मिळाला महिलांचा मोठा प्रतिसाद



मुंबई : निता लाड अध्यक्ष असलेल्या अंत्योदय प्रतिष्ठनच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत स्तन कर्करोग चिकित्सा शिबीरास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजित करण्यात आले होते. त्याअंतर्गत मुंबईतील विविध ठिकाणी स्तनकर्करोग चिकित्सा शिबिर लावण्यात आली आहेत.

 

भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस सेवा करुन साजरा करावा, अशा सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. तसेच दिल्लीतील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) शहा यांनी रुग्णांना फळे वाटून सेवा सप्ताहाचा शुभारंभ केला.

 

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्या कल्पनेतून स्थापन झालेल्या व त्यांच्या पत्नी निता लाड अध्यक्ष असलेल्या अंत्योदय प्रतिष्ठानने १६ ते २० सप्टेंबर कालावधीत मुंबईत सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत महिलांना मोफत स्तन कर्करोग चिकित्सा उपलब्ध करुन दिली आहे. या शिबिराचा सोमवारी (१६ सप्टेंबर) सायन कोळीवाडा विधानसभा मतदारासंघातील अँटाॅप हिल परिसरात शुभारंभ झाला.

 

शुभारंभा वेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निता प्रसाद लाड, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ, दिव्याताई ढाले, नेहाल खान, रमाकांत गुप्ता, अविनाश दुग्लज, सी. व्ही. नटेशन, सगुणाजी राजन, दिलीप खंदारे, भुपेंद्र जयस्वाल, कणिकराम चौधरी, राजेश कुमकर, अनिल कटके, उदयभान सिंग, उदय नांदे आदी उपस्थित होते.

 

१७ सप्टेंबर रोजी धारावीतील नाईक नगर येथे तर १८ सप्टेंबर रोजी धारावीच्या साठ फिट रोडला सकाळी ९ ते ५ या वेळेत मोफत स्तनकर्करोग चिकित्सा शिबीर ठेवण्यात आले आहे. मॅमोग्राफीसह सर्व चिकित्सा शिबीर स्थळी असून त्यासाठी हेल्पींग इंडिया स्वयंसेवी संस्थेची सर्व सोईंनी युक्त सुसज्ज व्हाेल्वो गाडी ठेवण्यात आली आहे. तपासणी दरम्यान महिलांमध्ये कोणतीही विकृती आढळल्यास आमचे कर्मचारी मार्गदर्शन करतील तसेच अशा महिलांच्या पुढील उपचारांसाठी प्रतिष्ठानकडुन मार्गदर्शन केले जाईल, असे शिबिराच्या आयोजक निता प्रसाद लाड यांनी सांगितले.

 
@@AUTHORINFO_V1@@