पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मदिन विशेष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2019
Total Views |




नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर २०१९ रोजी आपल्या ६९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. सोमवारी मध्यरात्रीपासूनच देशभरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जन्मदिनानिमित्त पंतप्रधान गुजरातमध्ये आहेत. दरम्यान देशभरातील अनेक मान्यवरांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


 

 

मंगळवारी सकाळी पंतप्रधान मोदी नर्मदा तटावर पोहोचले. त्यांनी येथे जाऊन नर्मदेची पूजा केली. येथील गुरुदेश्वर दत्तमंदिरात पूजा करणार आहेत. केवडिया येथे एका रॅलीला संबोधित करणार आहेत. या दरम्यान त्यांच्या आईचीही भेट घेणार आहेत. दरवर्षी मोदी आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या निवासस्थानी पोहोचतात.



 

 

म्हणून १.२५ किलो सोन्याचा मुकूट केला अर्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थकाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त १.२५ किलो वजनाचा सोनेरी मुकूट मारूतीला अर्पण केला. वाराणसी येथे संकटमोचन मंदिरात हा मुकूट मंदिरातील मूर्तीवर चढवण्यात येणार आहे. हा मुकूट चढवणाऱ्या अरविंद सिंह यांनी लोकसभा निवडणूकीला मोदी पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून आल्यास मुकूट चढवण्याची मनोकामना केली होती. ती पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी हा मुकूट हनुमानाच्या मुर्तीला अर्पण केला.

 




 
@@AUTHORINFO_V1@@