डॅन बिल्झेरिअन यांच्यामुळे स्पार्टन पोकर यांच्या इंडिया पोकर चँपियनशिपचे महत्व वाढले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2019
Total Views |


स्पार्टन पोकर यांनी आयोजित केलेली इंडिया पोकर चँपियनशिप (आयपीसी) या देशातील सर्वात मोठ्या पोकरची सप्टेंबर आवृत्ती मोठ्या दणक्यासोबत रविवारी १५ सप्टेंबर, २०१९ रोजी समाप्त झाली. या दिवशीच्या अंतिम सामन्यासाठी सुमारे २००० हून अधिक स्पर्धकांनी रु. ६ कोटींहून अधिक बक्षिसांच्या रकमेसाठी गोव्याच्या पणजीमधील बिग डॅडी कॅसिनो मध्ये गर्दी केली होती.

पाच दिवस चाललेल्या आणि उत्साहात खेळले गेलेल्या या सामन्यांमध्ये फ्रीझ आउट, हाय रोलर, हेडहंटर आणि अर्थातच वैशिष्टयपूर्ण असा अंतिम सामना असे इंडिया पोकर चँपियनशिपचे चार महत्वाचे भाग होते. या सप्टेंबर आवृत्तीसाठी खेळाडूंचा प्रचंड प्रतिसाद होता आणि त्यामध्ये गोव्याचा सहभाग सर्वात मोठा होता. त्यानंतर मुंबई, पुणे, चेन्नई, चंदिगढ आणि हैदराबाद येथूनही स्पर्धक आले होते. या वर्षी आदित्य सुशांत, राघव बसंल, निकिता लुथर, प्रणय चावला, अभिनव अय्यर आणि सिद्धार्थ मुंदडा यांनी स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्या अविस्मरणीय बनवल्या.

इंडिया पोकर चँपियनशिपचा थरार आणि आकर्षण वाढविण्यासाठी, यंदा प्रथमच डॅन बिल्झेरिअन हे २८ मिलियन फॉलोअर्स असणारे इन्स्टाग्रामचे बादशहा येथे उपस्थित होते. ते आपल्या चमकदार जीवनशैलीसाठी प्रसिद्ध असून त्यांनी या स्पर्धेचे महत्व वाढविण्यासाठी भारताला भेट दिली होती. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या इतर सुप्रसिद्ध कलाकारांमध्ये अभिनेते रणविजय सिंघा, बॉलीवूड अभिनेत्री मिनिषा लांबा, तसेच कुणाल खेमू आणि अनेक कलाकार होते.


या स्पर्धांविषयी बोलताना स्पार्टन पोकरचे सीईओ अमीन रोझानी म्हणाले
, “इंडिया पोकर चँपियनशिप या स्पर्धा नेहमीच आणि वर्षानुवर्षे खेळाडूंच्या आवडत्या ठरल्या आहेत आणि या वेळच्या स्पर्धा तर धमालच होत्या. संपूर्ण देशभरातून आलेल्या स्पर्धकांना येथे सहभागी होताना बघणे हा एक चित्तथरारक अनुभव होता. आणि खास म्हणजे आम्ही थेट गोव्यापर्यंत येऊन आमच्या या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या डॅन बिल्झेरिअन यांचे खूप आभारी आहोत. ही तर सुरुवात आहे आणि अनेक गोष्टी यायच्या आहेत.


कार्यक्रमाचे आकर्षक व्यक्तिमत्व आणि एक जादुई माणूस म्हणून सुप्रसिद्ध असलेले डॅन बिल्झेरिअन यांना भारतीय पोकर खेळाडूंची त्यामधील आवड बघून तसेच इंडिया पोकर चँपियनशिप
२०१९ मध्ये सहभागी होऊन खरोखरच खूप आनंद झाला होता.

@@AUTHORINFO_V1@@