
भारताचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून देशभरात नावलौकिक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६९ वा जन्मदिन. देशातील कानाकोपऱ्यातून त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा येत आहेत. अमूल या भारतातील एका अग्रगण्य दुग्ध उत्पादक संस्थेने त्यांच्या नेहेमीच्या अनोख्या अंदाजात पंतप्रधानांना एका व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
#Amul wishes the Hon. PM Shri Narendra Modi @narendramodi a very happy 69th birthday! #happybirthdaynarendramodi pic.twitter.com/E039hOXwlT
— Amul.coop (@Amul_Coop) September 16, 2019
या व्हिडिओमध्ये आतापर्यंत त्यांनी देशासाठी केलेली विकासकामे आणि 'अमूल' च्या उत्पादनांचा उल्लेख करत करत गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान इथपर्यंतचा मोदींचा प्रवास या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल. मग त्यामध्ये मोदींनी मिळवलेले बहुमताचे सरकार, स्वछ भारत अभियान, स्टार्टअप इंडिया, पंतप्रधान मोदींचे देशविदेशातील दौऱ्यांमुळे भारताचे अन्य देशांबरोबर वृद्धिंगत झालेले संबंध या सगळ्या गोष्टींचे वर्णन म्हणजे हा व्हिडीओ.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त देशात अनेकांनी त्यांना अशा अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र अमूलचा हा शुभेच्छापर व्हिडिओ देखील खास आहे हे नक्की.