मशिदींवरील भोंग्यांना कायदेशीर परवानगी द्या!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2019
Total Views |



मुंबई : अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या मागणीसाठी आग्रही असणाऱ्या शिवसेनेने रत्नागिरी जिल्ह्यात चक्क मुस्लीम समुदायाच्या हक्कांसाठी पुढाकार घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेनेचे नेते आणि म्हाडाचे अध्यक्ष असणारे उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात मशिदींवरील भोंग्यांना कायदेशीर परवानगी मिळवून देण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे उजेडात आले आहे. लीगल राईट्स ऑब्झर्व्हेटरीने (एलआरओ) उदय सामंत यांचे हे पत्र ट्विट केले असून शिवसेनेच्या या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना २९ ऑगस्ट रोजी हे पत्र धाडले आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लीम समाजाच्या अनेक मागण्या मान्य करण्याबाबत पक्षप्रमुखांना विनंती करण्यात आली आहे.

 

रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लीम मोहल्ल्यातील घरांच्या जमिनीवरील प्रॉपर्टी कार्डप्रमाणे ७/१२ च्या नोंदी करण्याबाबत तसेच शासकीय जमिनीवरील मशिदी अधिकृत करण्याबाबत संबंधित विभागास निर्देश देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. रत्नागिरीमधील सर्व मशिदींचे आणि कब्रस्थानांचे रजिस्ट्रेशन सरकारी ७/१२ ऐवजी गावजमातीच्या नावे ७/१२ करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. तसेच मोहल्ल्यातील समाजाच्या मिरकरवाडा, राजिवडा व इतर गावठाण जमिनीच्या महसुलीकरणाबाबत पाठपुरावा करण्यात आला आहे.

 

मशिदींवर भोंग्याची कायद्याच्या अधीन राहून परवानगी मिळण्याचेही यात नमूद करण्यात आले असून वक्फ बोर्डाचे कार्यालय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच कोकणातील मुस्लीम समाजासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हज हाऊसचीही निर्मिती करण्याची मागणी करण्यात आली आहे. रत्नागिरी शहराजवळील मुस्लीम समाजाला स्वतःची घरे नाहीत. त्याकरिता कोकण नगरच्या धर्तीवर मुस्लीम समाजासाठी भव्य वसाहत उभारणे, शहरात पासपोर्ट कार्यालय आणणे, मुस्लीम समाजासाठी कम्युनिटी हॉल उभारणे, मच्छीमारांसाठी पर्ससीनचा कालावधी वाढवून मिळवणे याही मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबत उदय सामंत यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

 

"संबंधित प्रकरणावर काही संघटनांनी याबाबत आवाज उठवलेला आहे. याबाबत कायदेशीर बाजूही तपासून घेणे तितकेच महत्वाचे ठरेल."

 

- माधव भंडारी, प्रवक्ते, भाजप

@@AUTHORINFO_V1@@