पवारांच्या बैठकीला छगन भुजबळ गैरहजर ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2019
Total Views |

 


नाशिक : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही उरल्या सुरल्या नेतेमंडळींना एकसंथ बांधून ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घ्यायला सुरुवात केली आहे. नाशिक महामार्गालगत राष्ट्रवादीच्या कार्यालयात या बैठका सुरू आहेत. पण या बैठकीला नाशिकचे ज्येष्ठ नेते छगन जबळ हे गैरहजर होते. त्यामुळे पुन्हा एकदा छगन भुजबळांच्या राष्ट्रवादी सोडण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

 

राष्ट्रवादीमधील नेत्यांचे पक्षांतर पाहता छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक जणांच्या मनात शंका उपस्थित झाल्या आहेत. परंतु, भुजबळ हे आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आहेत असे सांगून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सारवासारव केली. याआधीही अनेकवेळा पक्षाने भुजबळांना आणि भुजबळांनी पक्षाला डावलल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यादेखील नाशिक दौऱ्यावर होत्या. त्यावेळीही तब्येत बरी नसल्याचे सांगून छगन भुजबळ गैरहजर राहिले. तसेच छगन भुजबळ यांनी आपला फोन उचलला नसल्याचंही तेव्हा सुप्रिया सुळेंनी सांगितले होते. सुप्रिया सुळेंच्या नाशिक दौऱ्यावेळी नांदगावमध्ये राष्ट्रवादीच्या पोस्टरवरून छगन भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ गायब होते.


@@AUTHORINFO_V1@@